Pimpri News : पिंपरी : राज्य सरकार मराठा समाजावर अन्याय करत आहे. आरक्षणप्रश्नी दिलेला ४० दिवसांचा कालावधी उलटूनही योग्य निर्णय न घेता वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत भाजपला रामराम ठेकलेले प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी ठाकरे गटात पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात शिवबंधन बांधून पवार यांचे स्वागत केले. एकनाथ पवार यांची संघटकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून केले पवार यांचे स्वागत
या कार्यक्रमप्रसंगी खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, शहरप्रमुख सचिन भोसले, महिला संघटिका सुलभा उबाळे उपस्थित होते. एकनाथ पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहरात भाजप वाढविण्यात मोठे योगदान आहे. पवार यांनी आजपर्यंत भाजपमध्ये शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, प्रदेश प्रवक्ते, महापालिकेतील सभागृह नेते अशी विविध पदे भूषविली आहेत. (Pimpri News) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून पवार ओळखले जातात.
दरम्यान, दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना पदे मिळतात. आपल्याला डावलले जात असल्याची पवार यांची भावना झाली. महेश लांडगे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांची निवडणूक लढविण्याची संधी गेली. तीन वर्षेच सभागृह नेतेपद ठेवले. शेवटच्यावर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली. भोसरीतून निवडणूक लढण्याची संधी नसल्याने त्यांनी भाजपला रामराम ठोकला.(Pimpri News) एकनाथ पवार मूळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत. भोसरीतून निवडणूक लढविण्याची संधी नसल्याने त्यांनी दोन वर्षांपासून नांदेडमधील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात संघटना बांधण्याचे काम सुरु केले. तिथे शेतकरी कामगार पक्षाखालोखाल शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे पवार यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला.
मराठा समाजाला आरक्षण दिले जात नसल्याने भाजपला सोडचिठ्ठी दिली. मराठा आरक्षणास पाठिंबा देत असलेल्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
– एकनाथ पवार
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : दांडिया लागल्याच्या रागाने दोघांना कोयत्याने मारहाण; चौघांना अटक, एक पसार
Pimpri News : मनोज जरांगे पाटलांना पाठिंब्यासाठी पिंपरीत साखळी उपोषण
Pimpri News : संक्रमण काळातील योगदान समाजासाठी दिशादर्शक : प्रा. डॉ. सदानंद मोरे