Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : संक्रमण काळातील योगदान समाजासाठी दिशादर्शक : प्रा. डॉ. सदानंद मोरे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 October 2023, 12:45

Pimpri News : पिंपरी : “संक्रमणात समर्पण खूप महत्त्वाचे असते. संक्रमण काळातील योगदान हे समाजाला दिशादर्शक असते. यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे,” असे विचार ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

‘चैतन्याचा जागर’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन

राजेंद्र घावटे लिखित आणि पिंपरी-चिंचवड साहित्य मंच, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती आयोजित ‘चैतन्याचा जागर’ या ग्रंथरूपी वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. सदानंद मोरे बोलत होते. (Pimpri News) निगडी प्राधिकरण येथील खानदेश मराठा मंडळ सभागृहात रविवारी (ता. २२) हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, प्रकाशक नितीन हिरवे, लेखक राजेंद्र घावटे, जयश्री घावटे यांची व्यासपीठावर तसेच राज अहेरराव, राजाभाऊ गोलांडे, सुरेश कंक आणि साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

प्रा. डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी एका मोठ्या संक्रमणातून गेली आहे. आज ती साहित्य आणि संस्कृतीची नगरी म्हणूनसुद्धा ओळखली जाते. या स्थित्यंतराला सामोरे जाताना वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेल्या व्यक्तींचे योगदान खूप महत्त्वाचे ठरले. (Pimpri News) अशा पार्श्वभूमीवर एक जागल्या म्हणून राजेंद्र घावटे यांचे साहित्य, समाज, संस्कृती, प्रबोधन याप्रति समर्पण उल्लेखनीय आहे. त्याचेच प्रतिबिंब ‘चैतन्याचा जागर’ या वैचारिक लेखसंग्रहात उमटले आहे. आपल्या चांगल्या परंपरा, सण-उत्सवाच्या संकल्पना आणि राष्ट्र व समाजाचे चिंतन हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.”

 

नितीन हिरवे यांनी, “संयम, समर्पण अन् त्यागी वृत्ती यांचा समन्वय राजेंद्र घावटे यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे!” असे मत मांडले. प्रा. तुकाराम पाटील यांनी, “लेखकाला आपले पुस्तक अपत्यापेक्षाही प्रिय असते; साहित्यनिर्मिती ही एखाद्या तपस्व्याच्या व्रतासारखी असते,” अशी लेखन मीमांसा केली. लेखक राजेंद्र घावटे यांनी आपल्या मनोगतातून, “पवना इंद्रायणीचा परिसर, भक्ती आणि शक्तीचे पीठ असलेल्या या नगरीत माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. जीवनातील अनुभव, श्रवणभक्ती आणि वैचारिक बैठक यांची अनुभूती आयुष्याची पुंजी आहे. वाचन व श्रवणभक्तीतून मी घडलो. पद्मभूषण अण्णा हजारे आणि डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासह अनेक दिग्गजांचा सहवास लाभला. (Pimpri News) शेवटपर्यंत शब्दपंढरीचा वारकरी बनून माय मराठीची सेवा करण्याचे वरदान परमेश्वराने मला द्यावे,” असे सांगत कृतज्ञता व्यक्त केली.

पांडुरंग बलकवडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “सामाजिक बांधिलकी अन् वैचारिक प्रगल्भता हे ‘चैतन्याचा जागर’ या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे सुराज्य करण्याचे काम आपल्या देशातील विचारवंतांनी केले आहे. समाजाला वेळोवेळी येणाऱ्या वैचारिक ग्लानीच्या काळात अशा वैचारिक साहित्याने दीपस्तंभासारखे कार्य केले आहे,” असे गौरवोद्गार काढले.

गायत्री आणि शांभवी घावटे या विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्यातून सादर केलेली गणेशवंदना, दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. जयश्री घावटे यांनी प्रास्ताविकातून, “आपल्या आईकडून राजेंद्र घावटे यांना लेखनाची आणि वडिलांकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाली; परंतु आज त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते आहे,” अशी भावना व्यक्त केली.(Pimpri News)  नंदकुमार मुरडे आणि उज्ज्वला केळकर यांनी डॉ. रामचंद्र देखणे यांच्या प्रस्तावनेचे; तर नेहा कुलकर्णी आणि सागर यादव यांनी संग्रहातील ‘माझा सखा श्रावण’ या ललितलेखाचे अभिवाचन केले. पिंपरी-चिंचवड साहित्य संवर्धन समितीच्या वतीने विशेष मानपत्र देऊन राजेंद्र घावटे यांचा सन्मान करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड साहित्य मंच, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती, साहित्य संवर्धन समिती, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान आणि मित्रमंडळ, श्री शाहू वाचनालय, शिवतेज प्रतिष्ठान या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. प्रदीप कदम यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना घावटे यांनी आभार मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : लांडेवाडीत फॅक्टरीला भीषण आग; एकजण गंभीर जखमी

Pimpri News : चिखली- तळवडेतील प्रस्तावित रस्त्यांना ‘गती’- भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

Pimpri News : महिलेकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी; सांगवीतील सहायक फौजदार रंगेहाथ जाळ्यात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

Yavat News : यवतच्या रश्मी दरेकर ठरल्या 'होम मिनिस्टर'मधील पैठणीच्या मानकरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.