Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 4 July 2026, 13:35

जेजुरी, ता. ४ : पिसर्वे (ता. पुरंदर) गावात वीजचोरीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारवाईदरम्यान महिला कनिष्ठ अभियंत्याच्या हातातील मोबाईल हिसकावून फेकण्यात आला, तर पथकातील अधिकाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणण्यात आला. याप्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप अंकुश कोलते, सचिन कांतीलाल कोलते, गणेश कोलते, वैभव कोलते आणि अरुण अंकुश कोलते (सर्व रा. पिसर्वे, ता. पुरंदर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महावितरणचे प्रधानतंत्रज्ञ विक्रम किसनराव तुपे (वय ४१, रा. बारामती) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणचे प्रधानतंत्रज्ञ विक्रम तुपे हे गेल्या १६ वर्षांपासून महावितरणमध्ये कार्यरत असून सध्या राजेवाडी शाखेत प्रधानतंत्रज्ञ म्हणून काम पाहत आहेत. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार २ जुलै रोजी वीजचोरीविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेसाठी कनिष्ठ अभियंता मनीषा साबळे, वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश लिंभोरे, स्वप्निल भगत, वैभव वाघमारे, राजेंद्र खेसे, कानिफनाथ खेडेकर यांच्यासह दोन पथके तयार करण्यात आली होती. दुपारी साडेएक वाजण्याच्या सुमारास पथकाने पिसर्वे गावातील सुपा–सासवड मार्गावरील साईलिला हॉटेल येथे तपासणी केली असता, हॉटेलच्या मागील मोटार, पंखे व विद्युत उपकरणांसाठी बेकायदेशीररीत्या वीज वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. महिला कनिष्ठ अभियंता मनीषा साबळे या कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करत असताना १० ते १२ जणांचा जमाव तेथे जमा झाला. त्यातील काही जणांनी कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयित संदीप अंकुश कोलते याने साबळे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून रस्त्यावर फेकला.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी प्रधानतंत्रज्ञ विक्रम तुपे यांना मारहाण केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी जीवन दिलीप ठोंबरे घटनास्थळी पोहोचले असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. वाद अधिक वाढू नये म्हणून पथक तेथून निघाले. मात्र, पोलिस ठाण्याकडे जात असताना वैभव कोलते याने “पुन्हा येथे आलात तर हातपाय तोडू,” अशी धमकी दिली.

 

त्यानंतर जखमी अधिकाऱ्यांनी उपचार घेत जेजुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी संदीप अंकुश कोलते, सचिन कांतीलाल कोलते, गणेश कोलते, वैभव कोलते आणि अरुण अंकुश कोलते यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, धमकी देणे तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MH-12 चा जमाना संपला! पहिल्याच दिवशी व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी; चॉइस नंबरसाठी ११०० हून अधिक अर्ज दाखल

Friday, 28 August 2026, 8:02

१७ वर्षांपूर्वीचा कारनामा अन् फसवून लग्न! शिल्पाला छळणाऱ्या गवारे कुटुंबाचा काळा इतिहास समोर; खून, पैसा, प्रॉपर्टी अन् ब्लॅकमेल

Friday, 28 August 2026, 7:30

आज पाऊस पडणार की कडाका वाढणार! हवामान विभागाने दिला इशारा; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, वाचा आजच्या हवामानाची ताजी अपडेट

Friday, 28 August 2026, 7:16

Daily Horoscope: रक्षाबंधनाला जुळून आलाय ‘हंस राजयोग’! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; वाचा आजचं तुमचं राशिभविष्य

Friday, 28 August 2026, 7:05

पिंपळवंडीतील बालिकेवर अत्याचार-हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाची भेट; प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

Thursday, 27 August 2026, 22:55

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू अन् स्वाईन फ्लूचा विळखा तीव्र; अवघ्या २५ दिवसांत नोंदवले गेले तब्बल २०५ रुग्ण

Thursday, 27 August 2026, 22:36
Next Post

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp