Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 4 July 2026, 13:09

शिरूर: रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव, रांजणगाव परिसर,आठवडे बाजार तसेच प्रवासादरम्यान हरवलेल्या मोबाईलबाबत दाखल झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.तांत्रिक विश्लेषण आणि ट्रेसिंगच्या माध्यमातून तब्बल ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १५ हरवलेले मोबाईल शोधून त्यांचे मूळ मालकांना परत करण्यात आले.

नवनियुक्त पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली. विविध तांत्रिक साधनांचा वापर करून मोबाईलचे ट्रेसिंग करण्यात आले.अनेक नागरिक हरवलेला मोबाईल परत मिळण्याची आशाच सोडून देतात.मात्र,रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करत सन २०२५ पासून आजपर्यंत हरवलेल्या मोबाईलपैकी १५ मोबाईलचा यशस्वी शोध लावून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविला.

शोधून काढण्यात आलेले सर्व मोबाईल दि.४ जुलै २०२६ रोजी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या हस्ते संबंधित मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.अचानक हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.अनेकांनी हा अनुभव म्हणजे पोलिसांकडून मिळालेले “सरप्राईज गिफ्ट” असल्याची भावना व्यक्त केली.

या यशस्वी कारवाईस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल,अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे (खेड विभाग, अतिरिक्त कार्यभार शिरूर उपविभाग)यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी परिश्रम घेतले.

 

दरम्यान,हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असून, आणखी मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना परत देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली. पोलिसांच्या या नागरिकाभिमुख उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र स्वागत होत असून, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp