Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 4 July 2026, 13:22

पुणे, ता. ४ : चंदननगर परिसरातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या गार्डनसाठी आरक्षित जागेवर डल्ला मारण्यासाठी ‘५ वर्षांचा लिव्ह अँड लायसन्स करार’ असल्याचे सांगून प्रत्यक्षात २९ वर्षांचा लीज डीड तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सोसायटीचे तत्कालीन पदाधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी संगनमत करून बनावट ठराव, खोट्या नोंदी आणि कागदपत्रांचा आधार घेत फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आशा दादाभाऊ वाळके, विशाल दादाभाऊ वाळके आणि प्रीतपालसिंग जर्नेलसिंग नहाल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माजी पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी जयसिंग महादेव भुजबळ (वय ७८) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुगोविंद नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीची स्थापना १९७५ मध्ये झाली असून, सोसायटीच्या मालकीची सुमारे ५ एकर ३८ गुंठे जमीन आहे. त्यापैकी १८ हजार आणि १० हजार चौरस फुटांचे दोन भूखंड गार्डनसाठी कायमस्वरूपी आरक्षित असून, त्या जागेवर कोणतेही बांधकाम अथवा व्यावसायिक वापर करण्यास मनाई आहे.

सन २०१७ मध्ये तत्कालीन अध्यक्षा आशा दादाभाऊ वाळके, त्यांचा मुलगा विशाल वाळके आणि सभासदाचा मुलगा प्रीतपालसिंग जर्नेलसिंग नहाल यांनी गार्डनच्या जागेवर वाहन पार्किंगच्या नावाखाली जागा देण्याचा प्रस्ताव मांडला. हा करार केवळ पाच वर्षांसाठी लिव्ह अँड लायसन्स स्वरूपाचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्याचा आग्रह धरल्यानंतरही धमकावून करारावर सह्या करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर संबंधित जागेवर पत्र्याचे शेड उभारून व्यावसायिक वापर सुरू करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सोसायटी सदस्यांनी हरकत घेतल्यानंतरही त्यांना धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

दरम्यान, या गैरव्यवहाराबाबत सदस्यांनी सहकार विभाग आणि पुणे महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सुनावणी घेत तत्कालीन पदाधिकाऱ्यांना पदावरून हटविले, तसेच प्रभारी समितीची नियुक्ती केली. पुणे महानगरपालिकेनेही गार्डनच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून ते हटविले.

प्रभारी समितीला सोसायटीची कागदपत्रे मिळाल्यानंतर तपासणीमध्ये ५ वर्षांच्या कराराऐवजी २९ वर्षांचा लीज डीड तयार करण्यात आल्याचे, तसेच बनावट ठराव, खोट्या नोंदी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे हा व्यवहार केल्याचे निदर्शनास आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी आशा दादाभाऊ वाळके, विशाल दादाभाऊ वाळके आणि प्रीतपालसिंग जर्नेलसिंग नहाल यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात आणि धमकावल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49
Next Post

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.