Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापला! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 29 August 2026, 11:45

पुणे, ता. 29 : शहरातील ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याचा आरोप करत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी (ता. 27) ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. सत्या मुळे यांनी दिली.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघ, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, पुणे श्री स्वामी समर्थ सहकारी संस्था आणि 81 वर्षीय ज्येष्ठ नागरिक विलास लेले यांचा याचिकेत समावेश आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने 20 ऑगस्ट 2024 रोजी ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, गणेशोत्सव, धार्मिक सण, राजकीय कार्यक्रम, मिरवणुका तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उच्च क्षमतेचे डीजे, ॲम्प्लिफायर आणि लेझर बीमचा वापर सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या कर्णकर्कश आवाजाचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण, विद्यार्थी, दुकानदार आणि कामगारांना त्रास होत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. “ही याचिका कोणत्याही धर्म किंवा उत्सवाच्या विरोधात नसून सर्व प्रकारच्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आहे. पारंपरिक वाद्ये आणि संगीताचा कायदेशीर मर्यादेत वापर करण्यास विरोध नाही,” असे ॲड. सत्या मुळे यांनी स्पष्ट केले.

बार-पबमधील आवाजाचाही मुद्दा
याचिकेत शहरातील बार, पब, क्लब, रूफटॉप बार आणि रेस्टॉरंटमधून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, बालेवाडी, बाणेर आणि विमाननगरसारख्या निवासी भागांमध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजाचा त्रास होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या 112 हेल्पलाइनवर तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच राजकीय दबावामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचाही दावा करण्यात आला आहे.

 

दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. कलम 188 अंतर्गत कारवाई करत साउंड सिस्टिम जप्त करण्यात आल्या असून, एक हजारहून अधिक रीडिंग घेण्यात आली आहेत. त्यापैकी 148 प्रकरणांत नियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आगामी सण आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर संबंधितांशी चर्चा करून नियमांचे स्वयंस्फूर्त पालन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र, नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची भूमिका पोलिसांची राहणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लालकृष्ण अडवाणींची तब्येत बिघडली! दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल, सध्या प्रकृती कशी? वाचा

Saturday, 17 October 2026, 10:27

ना कुणाला संशय, ना कुणाला खबर! जुन्नरमध्ये पहाटेच्या वेळी उसाच्या शेतात सापडल्या गोण्या; पोलिसांनी पाहिलं अन्…

Saturday, 17 October 2026, 10:13

पुण्यात आपटा, शमी अन् आंब्याच्या फांद्या तोडल्यास 1 लाखांपर्यंत दंड? पुणे महापालिकेचा नागरिकांना स्पष्ट इशारा

Saturday, 17 October 2026, 9:58

ना पुरावा, ना मृतदेहाचा ठाव! सोन्याच्या साखळीसाठी दहावीतील मित्राला संपवलं; 21 दिवस पोलिसांना असा दिला गुंगारा

Saturday, 17 October 2026, 9:41

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

Saturday, 17 October 2026, 9:10

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Saturday, 17 October 2026, 8:14
Next Post

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ! टायर पंक्चर करून कुटुंबाला लुटलं, 18 लाखांचा ऐवज लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp