Sunday, November 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बँकॉकहून आलेल्या महिलेकडून पुणे विमानतळावर १.१४ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; कस्टमची कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 7 November 2026, 12:17

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. बँकॉकहून आलेल्या एका भारतीय महिला प्रवाशाकडून १ कोटी १४ लाख रुपये किमतीचा ३ किलो २५५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून, गांजा तस्करीमागील नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

पुणे कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-291 या विमानाने एक भारतीय महिला प्रवासी बँकॉकहून पुणे विमानतळावर दाखल झाली. प्रवाशांच्या प्रोफाइलिंगदरम्यान आणि चेक-इन बॅगेजच्या स्कॅनिंगमध्ये संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यामुळे एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) आणि विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेला ताब्यात घेत तिच्या सामानाची तपासणी केली.

या तपासणीत महिलेच्या ट्रॉली बॅगेच्या आतील अस्तरामागे दोन्ही बाजूंना विशेष पद्धतीने तयार केलेले छुपे कप्पे आढळले. या कप्प्यांमध्ये काळ्या प्लास्टिकच्या तीन थरांत व्हॅक्यूम सील केलेली दोन आयताकृती पाकिटे लपवण्यात आली होती.

पाकिटे उघडून तपासली असता त्यामध्ये उग्र वास येणारा नारिंगी-हिरवट रंगाचा वाळलेला वनस्पतीजन्य पदार्थ आढळला. नार्कोटिक ड्रग फील्ड टेस्टिंग किटद्वारे तपासणी केली असता हा पदार्थ हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले.

कस्टम विभागाने एकूण ३ किलो २५५ ग्रॅम गांजा जप्त केला असून, त्याची अंदाजे बाजारभावानुसार किंमत १ कोटी १४ लाख रुपये आहे. हा मुद्देमाल अमली पदार्थ आणि मनोविकारास कारणीभूत पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act, 1985) अंतर्गत जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. हा गांजा कोणासाठी आणण्यात आला होता, तस्करी कोणाच्या सांगण्यावरून केली जात होती आणि यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास पुणे कस्टम विभागाकडून सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत दोन तासांपासून बंद दाराआड चर्चा

Saturday, 7 November 2026, 21:52

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली! ‘KBC’चे शूटिंग थांबले, बिग बींच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता

Saturday, 7 November 2026, 20:57

पायल झांबरे प्रकरणात मोबाईल उघडणार गूढ? ‘चौथा आरोपी’ कोण, पतीसह तिघांची कोठडी वाढवली!

Saturday, 7 November 2026, 20:08

डकवर्थ-लुईसचा खेळ अन् किवींचा पराभव! टीम इंडियाने वर्षभरात 11 वेळा न्यूझीलंडला चारली धूळ

Saturday, 7 November 2026, 19:45

पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी पाडव्याला भरणार माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Saturday, 7 November 2026, 19:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत परिसरातील पथदिवे अखेर पुन्हा प्रकाशले!

Saturday, 7 November 2026, 19:13
Next Post

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षांच्या तारखा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp