Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर टँकरद्वारे डल्ला? यवत येथे शेतीच्या पाण्याचा रस्त्याच्या कामासाठी उपसा; परिसरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 29 November 2026, 12:04

राहुलकुमार अवचट

यवत : दौंड तालुक्यातील यवत परिसरात शेतीसाठी सोडण्यात आलेल्या जुन्या बेबी कालव्यातील पाण्याचा वापर रस्त्याच्या कामासाठी केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दुधाने चौक ते यवत गाव या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू असून, या कामासाठी खैरे वस्ती परिसरातील कालव्यातून दररोज टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी उचलले जात असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतीसाठी असलेल्या पाण्याचा रस्त्याच्या कामासाठी वापर होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दौंड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीसाठी उपलब्ध पाण्याचे महत्त्व वाढले आहे. यवत येथील जुना बेबी कालवा पाटसपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जाते. मात्र, सध्या दुधाने चौक ते यवत रस्त्याच्या कामासाठी याच कालव्यातून टँकरच्या मदतीने पाणी उचलले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

शेतीसाठी सोडलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत राहिल्यास आगामी काळात शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतीव्यतिरिक्त इतर कामांसाठी पाणी वापरण्याबाबत पाटबंधारे विभागाने योग्य निर्णय घ्यावा आणि विनापरवानगी पाणी उपसा होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

या प्रकाराबाबत यवतच्या शाखाधिकारी सुप्रिया मगर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पाणी उपशासाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. तसेच प्रत्यक्ष पाहणीनंतर संबंधित पाणी उपशाचे ठिकाण शाखा क्रमांक एकच्या कार्यक्षेत्रात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

याबाबत शाखा क्रमांक एकचे शाखाधिकारी शेलार यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित ठेकेदाराला कोणतेही लेखी पत्र दिले नसून केवळ तोंडी सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कालव्यातून पाणी उचलण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यवत ते दुधाने चौक या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या कामाबाबत आवश्यक माहिती देणारा फलक यवत गावात किंवा रस्त्याचे काम सुरू होणाऱ्या ठिकाणी लावण्यात आलेला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हा रस्ता कोणत्या निधीतून तयार केला जात आहे, कामासाठी किती निधी मंजूर झाला आहे, रस्त्याची लांबी आणि रुंदी किती आहे, काम पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे आणि संबंधित ठेकेदार कोण आहे, याबाबत नागरिकांना माहिती मिळत नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

एकीकडे शेतीच्या पाण्याचा रस्त्याच्या कामासाठी वापर होत असल्याचा आरोप, तर दुसरीकडे कामाबाबत माहितीफलक नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणी उपशाची परवानगी आणि प्रत्यक्ष वापराची तपासणी करावी, तसेच संबंधित विभागाने रस्त्याच्या कामाची माहिती सार्वजनिक करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर टँकरद्वारे डल्ला? यवत येथे शेतीच्या पाण्याचा रस्त्याच्या कामासाठी उपसा; परिसरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा

Sunday, 29 November 2026, 12:04

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरात हवामान कसे असेल? दिवसा उकाडा तर रात्री गारवा; जाणून घ्या आजचं हवामान

Sunday, 29 November 2026, 11:05

मांजरी परिसरात हातात कोयते घेऊन टोळक्याची दहशत; पाच जणांवर गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 11:04

दौंड येथे ऑनलाइन मुंबई-कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश! 15 जणांवर गुन्हा, अपंग व्यक्तीचा वापर केल्याचा पोलिसांचा आरोप

Sunday, 29 November 2026, 10:59

आनंदाचा क्षण अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! झारखंडच्या रामगडमध्ये भीषण अपघात; स्कॉर्पिओ आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Sunday, 29 November 2026, 10:14

ससेवाडीतील युनिव्हर्सल कॉलेजच्या उघड्या पाण्याच्या टाक्या वन्यजीवांसाठी ठरतायत मृत्यूचा सापळा!

Sunday, 29 November 2026, 9:17
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp