Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 29 November 2026, 13:15

पुणे : पुण्यात स्वतःचे हक्काचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील म्हाडाच्या ४ हजार ४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी तब्बल २ लाख ७२ हजार ५४३ अर्जदार पात्र ठरले आहेत. अर्जांची छाननी आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने शनिवारी अंतिम पात्र यादी प्रसिद्ध केली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरातील ४ हजार ४६२ घरांसाठी २४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या घरांसाठी एकूण ३ लाख २५ हजार ७७ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २ लाख ७४ हजार ६८ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली होती. अर्ज भरण्यासाठी तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती.

२३ नोव्हेंबर रोजी म्हाडाकडून प्रारूप पात्र यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळी कागदपत्रांच्या पडताळणीत ५ हजार ३९८ अर्जदार अपात्र ठरले होते. त्यानंतर अर्जदारांना हरकती आणि आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली. या हरकतींची पडताळणी केल्यानंतर अपात्र अर्जदारांची संख्या १ हजार ५२५ इतकी झाली आहे.

अंतिम पात्र यादी प्रसिद्ध झाल्यामुळे आता मंगळवारी होणाऱ्या सोडतीची उत्सुकता वाढली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात स्वतःचे घर मिळावे, या अपेक्षेने लाखो नागरिकांनी अर्ज केले आहेत. मात्र, उपलब्ध घरांची संख्या आणि पात्र अर्जदारांची संख्या यामध्ये मोठी तफावत असल्याने सोडतीत कोणाला घर मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी होणाऱ्या सोडतीनंतर हजारो अर्जदारांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार की प्रतीक्षा आणखी वाढणार, हे स्पष्ट होईल.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11

भोसरी येथे घराचा दरवाजा वाजविल्याचा जाब विचारताच तलवारीने हल्ला; बाप-लेकाच्या हत्येचा प्रयत्न, दोघे अटकेत

Sunday, 29 November 2026, 12:07

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर टँकरद्वारे डल्ला? यवत येथे शेतीच्या पाण्याचा रस्त्याच्या कामासाठी उपसा; परिसरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा

Sunday, 29 November 2026, 12:04

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरात हवामान कसे असेल? दिवसा उकाडा तर रात्री गारवा; जाणून घ्या आजचं हवामान

Sunday, 29 November 2026, 11:05
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp