Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने मागितली 25 लाखांची लाच, साडे 5 लाखांची लाच घेताना दोघे अडकले एसीबीच्या जाळ्यात, माळशिरस तालुक्यात एसीबीची धडक कारवाई

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 August 2026, 11:29

माळशिरस, ता. 29 : गुन्ह्यात अटक न करण्यासह तपासात मदत करण्याच्या नावाखाली पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे तब्बल 25 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. माळशिरस-पिलीव रोडवरील पुलाखाली 5 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन खासगी व्यक्तींना एसीबीने रंगेहाथ पकडले.

आबा सावळा वळकुंदे (वय 48, रा. वळकुंदे मळा, माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (वय 39, रा. मोटेवाडी, माळशिरस) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणात पोलीस हवालदार अनिल महादेव शिंदे आणि पोलीस हवालदार राहुल मारुती वाघ यांचीही नावे तक्रारीत समोर आली आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 21 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल झाली होती. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी 25 लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर अटकपूर्व जामीन मिळवून देणे तसेच काही कायद्याची कलमे न लावण्याच्या बदल्यात पुन्हा लाचेची मागणी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

24 ऑगस्ट रोजी केलेल्या पडताळणीत आबा वळकुंदे याने तक्रारदाराकडे पोलिस अधिकारी व डीवायएसपी यांच्या नावाने 25 लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 27 ऑगस्टच्या पडताळणीत तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देण्यासाठी 5 लाख रुपये डीवायएसपींसाठी आणि 50 हजार रुपये पोलिस हवालदारासाठी, अशी एकूण 5 लाख 50 हजार रुपयांची मागणी झाल्याचे समोर आले.

 

त्यानुसार 28 ऑगस्ट रोजी माळशिरस-पिलीव रोडवरील पुलाखाली एसीबीने सापळा रचला. यावेळी 5 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आबा वळकुंदे आणि महादेव माने यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोन्या-चांदीच्या परताव्यात कपात! आता दागिने स्वस्त होणार का? वाचा

Friday, 16 October 2026, 9:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत; 2 बोगदे, मेट्रोसह नवा प्लॅन जाहीर!

Friday, 16 October 2026, 9:13

बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी प्यायला लावलं! सौरव जोशीच्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर संताप

Friday, 16 October 2026, 9:09

पुण्यात IT इंजिनिअरची 27व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; मृत्यूनंतर वडिलांना धमकीचा फोन, धक्कादायक कारण आलं समोर

Friday, 16 October 2026, 8:59

नवरा आर्थिक अडचणीत आला तर ती त्याला सोडेल! पुण्यात विवाहित प्रेयसीसाठी प्रियकराने आखला अजब प्लॅन

Friday, 16 October 2026, 8:37

सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन! पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज; वाचा

Friday, 16 October 2026, 8:20
Next Post

लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! 1 किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp