लोणी काळभोर, ता. 17 : मशीन काम करणाऱ्या महिलेची छेडछाड करून तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरात नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत घडली असून एका शेतकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादासाहेब अंबादास नेटके (वय-57, रा. चिखलठाणवाडी ता.श्रीगोंदा, जि-अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 45 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्यादी या लोणी काळभोर परिसरात कुटुंबासोबत राहत असून मशीन काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. तर आरोपी नेटके हा शेतकरी आहे. फिर्यादी व आरोपी यांची ओळख होती. या ओळखीतूनच आरोपी हा फिर्यादी या घरी एकट्या असताना त्यांच्या घरी गेला. आणि त्यांचीशी लगट करू लागला. तेंव्हा फिर्यादी यांनी त्यास प्रतिकार केला. त्यानंतर आरोपीने अश्लील वर्तन करून फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून निघून गेला.
दरम्यान, आरोपी दादासाहेब नेटके याने फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग केला. तसेच त्यांना फोन द्वारे संपर्क साधुन शारीरीक सबंध ठेवण्याची मागणी करुन शिवीगाळ व दमदाटी करू लागला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. आणि आरीपी नेटके यांच्या विरोधात तक्रार दिली.
त्यानुसार आरोपी दादासाहेब नेटके यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 74,352,351 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करत आहेत.