उरुळी कांचन, (पुणे) : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी सोने खरेदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत मोठी भाववाढ असतानाही नागरिकांनी सोने खरेदीसाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. अशी माहिती जे. बी. सराफ व ज्वेलर्सचे भागीदार ॲड. प्रसाद बेदरे यांनी दिली.
सणांच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले होते. लग्नसराईच्या हंगामामुळेही सराफी गल्लीलाही झळाळी आली आहे. अक्षय तृतीयेलाही हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून उच्चांकी पातळीवर असलेले सोन्याचे दर वाढतच आहेत. 24 कॅरेटचे स्टँडर्ड सोने लाख रुपये प्रति दहा ग्रॅम आहे; तर चांदीचा दरही एक लाखांच्या पार गेला आहे.
उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांनी सोने खरेदीला विशेष पसंती देत खरेदी केली. यातच लग्नसराई देखील जोरात सुरू असल्याने सोने खरेदीसाठी लोकांची सराफी दुकानांवर गर्दी होवू लागली आहे. यातच अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत नाशिककरांनी सोने खरेदीसाठी दुकानामध्ये गर्दी केल्याने अनेक सराफी पेढ्यांवर एकच झुंबड उडाली. यावेळी खास करून तयार दागिन्यांना विशेष मागणी होत. यात सोन्याचे बिस्कीट, नाणे, वेढा, सोनसाखळी, बांगड्या, कानातील झुमके, गंठण, अंगठ्या, विविध दागिने आदींची जोरदार विक्री झाली.
दरम्यान, अक्षयतृतीयेनिमित्त यावेळी अनेक सराफी व्यावसायिक यांच्याकडून सोने घडवळीवर भरघोस सूटही देण्यात आली होती. या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात सोने खरेदीत कोट्यवधीची उलाढाल झाल्याचेही यावेळी व्यावसायिकांनी सांगितले. सोने खरेदी करताना कुठल्याही प्रकारची घाई ग्राहकांकडून व विक्रेत्यांकडून होत नसल्याने मनसोक्त ग्राहकांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधला.
याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील जे. बी. सराफ व ज्वेलर्सचे भागीदार ॲड. प्रसाद बेदरे म्हणाले, “सोन्याच्या उत्कृष्ट दागिन्यांची मागील 52 वर्षापासून विश्वासाची परंपरा जपणारे उरुळी कांचन व येथील जे. बी. सराफ व ज्वेलर्स यांना आपल्या विविध आकर्षक ऑफर् मुळे नेहमीच ग्राहकांची पहिली पसंती असते. त्यामुळे आपल्या आकर्षक डिझाईन्स् व तत्पर सेवांमुळे ग्राहकांना आपलेसे करणारे आहे. आपल्या उत्कृष्ट सेवा आणि आकर्षक ऑफर्सने ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केलेल्या जे. बी. सराफ व ज्वेलर्स आगामी काळातही ग्राहकांना अशाच सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.”