Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये ‘दादा’ची हातभट्टी, हडपसरमध्ये वजनदार ‘अण्णा’च्या हॉटेलमध्ये खाली पत्त्यांचा खेळ आणि वरती खुलेआम देहविक्री

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 May 2025, 12:56
Illegal business increased in hadapsar, loni kalbhor and phursungi pune

लोणी काळभोर : पुणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. मात्र, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक दादा बिनधास्तपणे हातभट्टी अड्डा चालवीत आहे. तर, हडपसर येथील 15 नंबर परिसरात एक वजनदार ‘अण्णा’ हॉटेलमध्ये खाली पत्त्यांचा खेळ आणि वरती खुलेआम देहविक्री करीत आहेत. तसेच फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉजवर देखील ‘जिस्म का व्यापार’ सुरु असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. ११६० शेजारी असलेल्या वनविभागाच्या जागेत एक दादा मागील तीन महिन्यांपासून खुलेआम हातभट्टी अड्डा चालवीत आहे. या अवैध धंदेचालकाच्या ”हाके”ला हडपसर मधील एक ”घनशाम” येत आहे. तर हा धंदेचालक एका सत्ताधारी आमदाराचा निकटवर्तीय असून त्यांच्याशी त्याचे जवळचे हितसंबंध असल्याचे समोर येत आहे. याच पोलीस ठाण्यातील एक ”वीर” बहाद्दर व ”खिलाडी” कुमार हे दोघेजण संगनमताने मोठी माया गोळा करीत आहेत. याबाबतची माहिती पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्याला दिली जात नसल्याने सदर अड्ड्यावर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात नाही.

 

लोणी काळभोर वनविभागाचा खाजगी कर्मचारी दादाच्या हातभट्टीच्या अड्ड्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर राहत आहे. त्यामुळे या ‘बाबू’लाही फुलाची पाकळी दिली जात आहे. त्याचबरोबर वनविभागाच्या अधिकाऱ्यांचीही मोठी मनधरणी केली जात आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करेन, या भीतीने दादाकडून रेल्वे पुलावर दोन खबरी लक्ष देण्यासाठी दररोज रात्री बसवले जातात. हे खबरी पुलाच्या खालून जाणाऱ्या गाडीवर लक्ष देतात. धोक्याची घंटा वाजली की, सर्वजण गबाळ गुंडाळून तेथून रफुचक्कर होतात. या अवैध धंद्यामागे वनखाते-50 हजार, बाबू- 5 हजार , शेतकरी (पाणी)- 15 हजार, स्वयंघोषित पत्रकार 10 हजार, तर सर्वात मोठी मोह माया म्हणजेच एक लाख पोलीस प्रशासनाला दिली जात आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत 15 नंबर परिसरात एका वजनदार आण्णाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर मागील तीन वर्षापूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी मुलींची सुटका करून एका वेटरवर पिटांतर्गत कारवाई केली होती. मात्र या हॉटेलवर मागील सहा महिन्यांपासून हॉटेलमध्ये खाली पत्त्यांचा खेळ आणि वरती खुलेआम देहविक्री सुरु आहे. तर या हॉटेलमध्ये पत्ते खेळण्यासाठी काही पोलीस सुद्धा येत आहेत. तर या हॉटेलमध्ये वरच्या दोन मजल्यांवर खुलेआम देहविक्री केली जात आहे. या हॉटेलच्या स्वागतकक्षाच्या पाठीमागे एक गुप्त खोली आहे.

वजनदार अण्णाने मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लॉजच्या जवळ असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भाडेतत्वावर खोली घेतली आहे. ही इमारत लॉजच्या अगदी शेजारी असल्याने मुली रुमच्या गॅलरीमधून थेट लॉजच्या टेरेसवर येतात. त्यानंतर त्या लॉजमध्ये प्रवेश करतात. तसेच हा अण्णा लॉजचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी बंद करून ठेवतो. ओळखीचा ग्राहक असेल, तरच त्यांना आतमध्ये प्रवेश देतो. अशा पद्धतीने या लॉजवर खाली जुगार व वर वेश्या व्यवसाय सुरु आहे. अण्णाचे पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी जवळचे हितसंबंध आहेत. त्यामुळे या अण्णालाही पोलीस प्रशासनाच्या कारवाईपासून मोकळीक मिळाली आहे.

लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही गावांचा समाविष्ठ करून नव्याने सुरु करण्यात आलेल्या फुरसुंगी (ता. हवेली) पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील चार महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांचा सूळसुळाट सुरु आहे. हडपसर-सासवड मार्गावर मटका, जुगार, गांजा विक्री, गावठी दारु व देह विक्री व्यवसायासह सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे. पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारीत नसल्याने अवैध धंदे सुसाट सुरु आहेत. संबंधित अवैध धंदे चालकांच्या पाठीमागे काही राजकीय नेते व पोलीस खात्यातील काही वरिष्ठांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे हे धंदे राजरोसपणे सुरु असून गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत.

दरम्यान, पुणे शहर पोलीस दलाची तगडी यंत्रणा असतानाही अवैध धंदे बिनधास्त सुरु आहेत. या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरु आहे. तसेच हे सगळे अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत, मग हे गोरख धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत? तर लोणी काळभोर, हडपसर व फुरसुंगी पोलीस नेमके करतात तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळख असलेले पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे यावर ठोस उपाययोजना म्हणून काय कारवाई करणार?. याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोणी स्टेशन परिसरात दररोज लाखों रुपयांची गांजाची विक्री
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरातील एका गॅस एजन्सीच्या जवळ एक टपरी आहे. या टपरीतून दररोज लाखों रुपयांच्या गांजाची खुलेआम विक्री केली जात आहे. या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याने लोणी काळभोर (ता. हवेली) येथे एम आय टी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना गांजा विक्री करून त्यांच्या मनामध्ये ‘संतोष’ निर्माण केला आहे. त्यामुळे विद्यार्थी व्यसनाधीन झाले आहेत. तर अष्टापुरे मळ्याच्या परिसरात एकजण पत्त्यांचा क्लब चालवीत आहे . या दोघांवर कारवाई कधी होईल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कर्वेनगरमध्ये सोसायटीच्या 32 लाखांवर ‘डल्ला’; माजी प्रशासक आणि साथीदारावर गुन्हा दाखल

Friday, 5 June 2026, 22:29
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Next Post

पहलगाम हल्ल्यानंतर रेल्वे विभाग अलर्ट ; तब्बल 24 एक्सप्रेस रेल्वेमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.