Saturday, August 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 5 June 2026, 21:43

राहुलकुमार अवचट

पुणे: फुगेवाडी, दापोडी व हडपसर येथील प्रथमदर्शनी मेथेनॉल मिश्रित गावठी दारू प्राशन घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २९ मे ते ४ जून या कालावधीत धडक कारवाई करुन एकूण १ कोटी ४७ लाख २७ हजार १४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता , प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार पुणे विभागाने अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे.

या कालावधीत एकूण १४२ गुन्हे नोंद करण्यात आले असून एकूण ११६ आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्यामध्ये ८ हजार ४७२ लि. तयार गावठी दारू जप्त करण्यात आली असून गावठी दारू तयार करण्यासाठीचे ६९ हजार २७१ लि. रसायन जागीच नाश करण्यात आले आहे. तसेच ११ हजार ७३३ लि. परराज्यातील व बनावट मद्य ही जप्त करण्यात आले आहे. दारूच्या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एकूण ११ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
सर्व विक्री व निर्मितीचे हॉटस्पॉट संवेदनशील गाव येथील हातभट्टी केंद्र नेस्तनाबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून हातभट्टी निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल पुरवठादारांना गुन्ह्यात आरोपी करून कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

 

सराईत गुन्हेगारा कडून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ नुसार चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी एकूण १२५ प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. मेथेनॉल मिश्रित दारूप्राशन करून नागरिकांचा मृत्यू झाल्याचा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. त्या गुन्ह्याशी संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ गुन्हे नोंदविले होते त्यांचा तपास सीआयडी सोबत करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी पुणे व पिं. चि. मनपा आयुक्त यांना त्यांचे हद्दीमध्ये विषारी दारूचे दुष्परिणाम व त्यास प्रतिबंध घालण्यासाठी ध्वनिफीत घंटागाडीच्या ध्वनिक्षेपावरून वाजविणे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गावठी दारूच्या नोंदविलेल्या गुन्ह्याची ठिकाणे अवैध बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्याची विनंती केली आहे. अशाच प्रकारच्या सूचना सर्व नगरपरिषद, नगरपालिका, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व उप विभागीय दंडाधिकारी, सर्व पोलीस उपायुक्त पुणे व पिंपरी-चिंचवड यांना विषारी दारूसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सराईत गुन्हेगारांवर जरब बसण्यासाठी कलम ९३ खाली अधिकाधिक रक्कमेचे बंधपत्र घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच,ग्रामसेवक, तलाठी यांना त्यांच्या गावामध्ये गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्याबाबत व सरकारी जमिनीचा अवैध धंद्यांसाठी वापर होत असल्यास त्याला प्रतिबंध करण्याबाबत सूचना देण्याबाबतच्या सूचना (नोटीस) राज्य उत्पादन शुल्क विभाग मार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच महावितरणलाही अशा अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांना देण्यात आलेल्या अधिकृत किंवा अनधिकृत वीज जोडण्या तोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच गावठी दारू निर्मिती करणारऱ्यास गुळाचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यानाही कलम १६८ खाली प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आल्या आहेत.

मेथेनॉल बाबत सह आयुक्त, औषध प्रशासन विभाग यांना भेटून पुणे जिल्ह्यातील सर्व मेथेनॉल अनुज्ञप्ती धारक, पुरवठादार यांची यादी प्राप्त करून घेण्यात आलेली आहे. सर्व घटकांना राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन भा.ना.सु. संहितेच्या कलम १६८ नुसार नोटीस बजाविण्यात आलेल्या आहेत. औषध प्रशासन विभागाकडून मेथेनॉलच्या पुरवठादारांच्या व्यवहारांची तपासणी करून अवैध करण्यासाठी मेथेनॉलचा पुरवठा केल्यास कडक कारवाई करण्याबाबत विनंती केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागरिकांना अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याच्या व अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्या गुन्हेगारांविषयी माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा ०२०-२६१२७३२१ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हाताच्या फ्रॅक्चरचं ऑपरेशन होतं, पण OT मधून आली मृत्यूची बातमी; पुण्यातील विवाहितेसोबत नेमकं काय घडलं? नवऱ्याचा गंभीर आरोप

Saturday, 8 August 2026, 13:16

AC कोचमधून बेडशीट, उशी, टॉवेल गायब! पुणे रेल्वेत 5 वर्षांत 2 लाखांहून अधिक वस्तूंची ‘चोरी’

Saturday, 8 August 2026, 12:54

पावसाचा रौद्र अवतार पुन्हा दिसणार? बंगालच्या उपसागरात मोठी हालचाल; अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Saturday, 8 August 2026, 12:30

Pune News: व्यावसायिकावर गोळीबार करणाऱ्या तीन दरोडेखोरांना इंदूर येथून 24 तासांत बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट-7 आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2 ची कामगिरी

Saturday, 8 August 2026, 11:43

उरुळी कांचनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; दत्तवाडी परिसरात पहाटे घरफोडी, CCTVत चोरटे कैद तरी तपासाचा पत्ता नाही, पोलिसांचा धाक संपला की काय?

Saturday, 8 August 2026, 11:28

दारूचे पैसे मागितले, आईने नकार दिला; संतापलेल्या मुलाने लोखंडी रॉडने मारहाण करून आईला संपवलं; भोर येथील घटना

Saturday, 8 August 2026, 11:20
Next Post
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; 'कर्त्या' पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.