Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 5 June 2026, 21:47
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिलेंडर बदलत असताना झालेल्या गॅस गळतीनंतर भीषण आग आणि स्फोट होऊन गंभीर भाजलेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत घरातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना शुक्रवारी सकाळी सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास खराडीतील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी सोसायटीमधील एका घरात घडली. मृतांमध्ये विष्णु मुंजाजी गिते (वय 60), पांडुरंग विष्णु गिते (वय 35) आणि वृंदावनी विष्णु गिते (वय 55) यांचा समावेश आहे. तर राजेश्री पांडुरंग गिते आणि 5 वर्षीय निहारिका गिते या दुर्घटनेतून बचावल्या असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, घरातील स्वयंपाकघरात वापरातील गॅस सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर जोडण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी नव्या सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती होऊ लागली. काही क्षणांतच सिलेंडरला आग लागल्याचे लक्षात येताच पांडुरंग गिते यांनी प्रसंगावधान दाखवत सिलेंडर घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत घरभर पसरलेल्या गॅसमुळे अचानक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण घराला आग लागली.

 

या स्फोटात स्वयंपाकघरात उपस्थित असलेले तिघे गंभीर भाजले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच दुपारच्या सुमारास तिघांचाही मृत्यू झाला. सुदैवाने त्या वेळी घरातील सुन बाथरूममध्ये आणि 5 वर्षांची मुलगी गॅलरीत असल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

घटनेची माहिती मिळताच खराडी, येरवडा आणि धानोरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत घरातील फर्निचर, टीव्ही, विद्युत वायरिंग, गिझर, दरवाजे आणि इतर साहित्य जळून खाक झाले होते. हॉलचे सिलिंग पूर्णपणे जळाले असून स्फोटाच्या तीव्रतेमुळे घरातील अनेक वस्तूंचे तुकडे झाले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘टाळ-मृदंगाच्या गजरात पळसनाथ दिंडी विठ्ठल भेटीसाठी रवाना; भक्तीचा महासागर उसळला!’

Sunday, 26 July 2026, 14:35

चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचा बोजवारा; ४२० क्युसेक पाणी गळतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा……

Sunday, 26 July 2026, 14:15

“विद्यार्थ्यांवर लाठीचार्जाचे आदेश कोणी दिले?’; राहुल गांधींचे अमित शाहांना थेट 2 सवाल, केंद्रावर हल्ला!”

Sunday, 26 July 2026, 13:59

NEET नंतर आता ‘या’ प्रश्नावर रणशिंग; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट इशारा, ‘खड्डामंत्री’वर निशाणा

Sunday, 26 July 2026, 12:55

सोनं पुन्हा महागलं! आठवड्यात मोठी उसळी;24 कॅरेटचा भाव ₹1,44,930 प्रति तोळा,जाणून घ्या आजचे दर

Sunday, 26 July 2026, 11:39

मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार; रॅलीपूर्वी संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष, भाजपलाही टोला!

Sunday, 26 July 2026, 11:00
Next Post

PiperSpin Casino – Uživajte v 24/7 dostopu do igralnice od doma v Sloveniji

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.