Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचा बोजवारा; ४२० क्युसेक पाणी गळतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा……

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 26 July 2026, 14:15

न्हावरे : चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामात प्रशासनाने चुकीचा प्राधान्यक्रम अवलंबल्याचा गंभीर आरोप शेतकरी कृती समितीने केला असून, हेडकडील सर्वाधिक पाणी गळती होणाऱ्या भागाकडे दुर्लक्ष करून टेलकडील भागात अस्तरीकरण सुरू केल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपेक्षित लाभ होत नसल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुख्य गळतीच्या भागाला तातडीने प्राधान्य न दिल्यास हजारो शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

चासकमान धरणापासून १ ते ७२ किलोमीटर या कालव्याच्या सुरुवातीच्या भागात सुमारे ७० टक्के पाण्याची गळती होत आहे. धरणातून सोडण्यात येणारे ६०० क्युसेक पाणी शिरूर तालुक्यातील मुखईपर्यंत पोहोचेपर्यंत केवळ १८० क्युसेक उरते, म्हणजेच तब्बल ४२० क्युसेक पाणी गळतीमुळे वाया जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती असतानाही हेडकडील या मुख्य भागाच्या अस्तरीकरणासाठी अद्याप टेंडरही काढण्यात आलेले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

याउलट कालव्याच्या १२१ ते १४४ किलोमीटर या टेलकडील भागात घाईघाईने अस्तरीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. कालव्याचे अस्तरीकरण हे तांत्रिकदृष्ट्या ‘हेड-टू-टेल’ पद्धतीने होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करून उलट क्रमाने कामे सुरू असल्याने पाणी बचतीचा मूळ उद्देशच धोक्यात आल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे.

याशिवाय कालव्याच्या ७३ ते १२० किलोमीटर या भागातील अस्तरीकरणाला प्रशासकीय मान्यता मिळूनही प्रत्यक्ष काम बंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.प्रशासनाने १९ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातील दावे आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करत, केवळ कागदी कार्यवाही करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याची टीका शेतकरी कृती समितीने केली आहे.

 

दरम्यान, शेतकरी कृती समितीने चासकमान डाव्या कालव्याची हेड-टू-टेल प्रत्यक्ष पाहणी करून पाणी गळतीचा सविस्तर अभ्यास केला होता. या पाहणीनंतर तयार करण्यात आलेल्या अहवालात सुरुवातीच्या भागातच सर्वाधिक गळती होत असल्याचे नमूद करून तो अहवाल संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, अहवालाकडे दुर्लक्ष करून टेलकडील भागातच अस्तरीकरण सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

शेतकरी कृती समितीचे सदस्य तात्यासाहेब सोनवणे,सागर खंडागळे,आशितोष बेंद्रे, बाळासाहेब बेंद्रे आणि विशाल झेंडे यांनी सांगितले की, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके व जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने वास्तव परिस्थितीची पाहणी करून ज्या भागात सर्वाधिक गळती होत आहे, त्या भागाच्या अस्तरीकरणाला प्रथम प्राधान्य द्यावे. अन्यथा हजारो शेतकऱ्यांच्या सहभागातून तीव्र जन आंदोलन उभारले जाईल. असा इशारा शेतकरी कृती समितीने दिला आहे.

“चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम ‘हेड-टू-टेल’ पद्धतीनेच व्हावे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्र्यांना देण्यात आले आहे.”
– सुभाष कांडगे (सदस्य, महाराष्ट्र प्रदेश भाजपा किसान मोर्चा)

“शासन निर्णयानुसार चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू आहे.”
– अजय वाघमोडे (उपअभियंता, चासकमान, शिक्रापूर)

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

Wednesday, 30 September 2026, 23:23

लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील रेल्वे अंडरपासच्या कामाला अखेर सुरुवात; सनी काळभोरसह मान्यवरांचे ग्रामस्थांनी मानले आभार..

Wednesday, 30 September 2026, 23:11

महाराष्ट्राला बनवणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’! नवी मुंबईत ३०० एकरवर भव्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ उभारली जाणार

Wednesday, 30 September 2026, 22:58

Ind Vs WI 2nd ODI : गुवाहाटीत डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार! वन-डे सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय; एकाच सामन्यात मोडले तब्बल १० पेक्षा जास्त ऐतिहासिक विक्रम

Wednesday, 30 September 2026, 22:41

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05
Next Post

'टाळ-मृदंगाच्या गजरात पळसनाथ दिंडी विठ्ठल भेटीसाठी रवाना; भक्तीचा महासागर उसळला!'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp