Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्राला बनवणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’! नवी मुंबईत ३०० एकरवर भव्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ उभारली जाणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 30 September 2026, 22:58

मुंबई : महाराष्ट्राला भविष्यात जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना त्यांनी राज्यातील स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध योजनांची माहिती दिली.

देशातील एकूण स्टार्टअपपैकी सुमारे १८ टक्के स्टार्टअप्स महाराष्ट्रात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यात ३० हजारांहून अधिक स्टार्टअप्स असून देशातील ही सर्वाधिक संख्या असल्याचे त्यांनी नमूद केले. स्टार्टअप क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी राज्यात तंत्रज्ञान आणि नवकल्पनांवर आधारित वातावरण तयार करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबईत सुमारे ३०० एकर जागेवर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, नवकल्पना आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे.

‘महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६’ अंतर्गत राज्यातील सुमारे दोन लाख युवक आणि व्यावसायिकांना AIचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे विविध क्षेत्रांमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यास मदत होईल, अशी माहिती देण्यात आली.

 

राज्यातील पहिले समर्पित स्टार्टअप इन्क्युबेटर म्हणून ‘एम-हब’ विकसित करण्यात येत आहे. नव्या उद्योगांना मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या केंद्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, डिजिटल प्रशासन आणि हवामान बदल यांसारख्या क्षेत्रांमध्ये नव्या पिढीचा दृष्टिकोन प्रशासनात आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन अधिक प्रभावी आणि नवकल्पनांना पूरक बनवण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

महाराष्ट्राला बनवणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’! नवी मुंबईत ३०० एकरवर भव्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ उभारली जाणार

Wednesday, 30 September 2026, 22:58

Ind Vs WI 2nd ODI : गुवाहाटीत डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार! वन-डे सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय; एकाच सामन्यात मोडले तब्बल १० पेक्षा जास्त ऐतिहासिक विक्रम

Wednesday, 30 September 2026, 22:41

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी सुनावणी! खरातच्या ‘त्या’ व्हिडिओंबाबत कोर्टाचा महत्वाचा आदेश; ‘व्हिडीओ वकिलांना दाखवा पण…’

Wednesday, 30 September 2026, 20:26

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या विमानात हायजॅकचा थरार! ९/११ सारख्या हल्ल्याचा कट? कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूहल्ला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 30 September 2026, 19:57
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp