Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 30 September 2026, 21:05

मुंबई : नवरात्रोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच मुंबईसह राज्यभरात गरबा आणि दांडिया कार्यक्रमांच्या आयोजनाला सुरुवात झाली आहे. मोठी मैदाने, नामांकित कलाकार, विविध प्रायोजक आणि ऑनलाइन तिकीट विक्रीच्या माध्यमातून या कार्यक्रमांची तयारी करण्यात आली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर गरबा आणि दांडिया कार्यक्रमांच्या आयोजनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मराठी एकीकरण समितीने भव्य स्वरूपातील गरबा-दांडिया कार्यक्रमांना विरोध दर्शवला आहे.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गरबा आणि दांडियावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याऐवजी हा पैसा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, अशी भूमिका मराठी एकीकरण समितीकडून मांडण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई आणि शेतीच्या नुकसानीचे संकट असल्याचे समितीने म्हटले आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना सामाजिक परिस्थितीचाही विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

समितीच्या म्हणण्यानुसार, गरबा आणि दांडिया हे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम असले तरी सध्या त्यांचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक स्वरूपात आयोजन केले जात आहे. मोठ्या मैदानांवर कार्यक्रम, प्रायोजक, कलाकार आणि तिकीट विक्री यामुळे या कार्यक्रमांभोवती मोठ्या आर्थिक उलाढाली होत असल्याचा दावा समितीने केला आहे.

याशिवाय काही ठिकाणी राजकीय नेते आणि कार्यकर्तेही अशा कार्यक्रमांच्या आयोजनात सहभागी होत असल्याचा मुद्दा समितीने उपस्थित केला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमांसाठी होणाऱ्या खर्चाबाबत चर्चा सुरू झाली आहे. आयोजकांनी उत्सवाचे नियोजन करताना दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीचा विचार करावा आणि सामाजिक जबाबदारी जपावी, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

 

दरम्यान, गरबा आणि दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करावे की त्यावर मर्यादा आणाव्यात, यावरून विविध स्तरांत मतभेद होण्याची शक्यता आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर मुंबईसह राज्यभरात आगामी काळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41
Next Post

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp