Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 22 October 2026, 22:49

शिरूर: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.२३) मतदान होणार असून, मतदानापूर्वीच पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात कथित लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा रंगली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असताना शिक्षक मतदारांवर पैशांचा वर्षाव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, या कथित प्रकारामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा वापर होत असल्याच्या चर्चेमुळे ‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे.

पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात काही शिक्षक मतदार संघातील उमेदवारांकडून शिक्षक मतदारांना प्रत्येकी १० हजार रुपये दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिरूर तालुक्यातील सर्व ६१६ शिक्षक मतदारांना पैशांचे वाटप झाल्याची माहितीही चर्चेत आहे. मात्र, शिक्षकांसारख्या समाजाला दिशा देणाऱ्या घटकाच्या निवडणुकीतच पैशांच्या वापराची चर्चा सुरू झाल्याने या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात एकूण ६१ हजार ९४० शिक्षक मतदार असून, त्यापैकी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ८२२ मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील मतदारांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. त्यातही शिरूर तालुक्यातील ६१६ शिक्षक मतदारांकडे उमेदवारांचे विशेष लक्ष लागले आहे.

शिरूर तालुक्यात सहा मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. न्हावरे येथील मतदान केंद्रावर ५६, पाबळ येथे १०३, शिरूर येथे २७८, टाकळी हाजी येथे ४६, तळेगाव ढमढेरे येथे ९४, तर वडगाव रासाई येथील मतदान केंद्रावर ३९ शिक्षक मतदार आहेत. अशा प्रकारे तालुक्यातील एकूण शिक्षक मतदारांची संख्या ६१६ आहे. या मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

या निवडणुकीत भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर, सचिन सानप आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्यात प्रमुख लढत होत आहे. भाजपचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यातील लढतीकडे विशेष लक्ष दिले जात असून, इतर उमेदवारांमुळेही निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक आणि भावी पिढी घडविणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत वैचारिक भूमिका, शैक्षणिक प्रश्न, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मतदानापूर्वीच पैशांच्या कथित वाटपाची चर्चा सुरू झाल्याने या निवडणुकीच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आता शिक्षक मतदार पैशांच्या आमिषाला महत्त्व देतात की उमेदवारांची कार्यक्षमता, भूमिका आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरील बांधिलकीला प्राधान्य देतात, हे मंगळवारी (ता.२७) बालेवाडी (पुणे) येथे होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

“२३ ते २५ हजार मतांचा टप्पा गाठल्यास विजय निश्चित”…..

“२३ ते २५ हजार मतांचा टप्पा गाठल्यास विजय निश्चित असल्याचा अंदाज शिक्षक मतदार संघातील उमेदवारांना असल्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याची जोरदार चर्चा आहे. मतांचा विजयी आकडा गाठण्यासाठी प्रमुख उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp