Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 22 October 2026, 20:30

पुणे (बाणेर) : पुण्यातील बाणेर परिसरात कोट्यवधी रुपये किमतीची जमीन हडपण्याच्या प्रयत्नातून बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. खोट्या सह्या, बनावट स्टॅम्प पेपर आणि निलंबित नोटरीच्या नावाचा गैरवापर करून जुन्या तारखेचे करारनामे तयार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रामदास हनुमंत सायकर (वय ५७), शकुंतला हनुमंत सायकर (वय ७६), रंजना हनुमंत सायकर (वय ७४), छाया सुनील रासकर (वय ५६, सर्व रा. करंदी, ता. शिरूर), तसेच योगेश पोपटराव कळमकर आणि जीवन पोपटराव कळमकर (दोघे रा. बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. स्नेहल संजय पिंपरकर (वय ५६, रा. औंध) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, स्नेहल पिंपरकर आणि त्यांच्या पतीने सायकर कुटुंबाकडून बाणेर येथील जमीन नोंदणीकृत खरेदीखताद्वारे पूर्ण पैसे देऊन खरेदी केली होती. जमिनीचा ताबाही त्यांच्याकडे होता. मात्र, या जमिनीवर हक्क सांगण्यासाठी आरोपींनी संगनमत करून १४ सप्टेंबर २००१ या तारखेचा १०० रुपयांचा बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र तयार केल्याचा आरोप आहे.

या कागदपत्रांवर नोटरी सतीशकुमार तिवारी यांच्या सही आणि शिक्क्याचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, तिवारी यांचे नाव १२ एप्रिल १९९६ रोजीच नोटरी रजिस्टरमधून वगळण्यात आले होते. तसेच, संबंधित स्टॅम्प पेपर विकल्याचे स्टॅम्प विक्रेत्याने नाकारल्याचे आणि दस्तावरील साक्षीदार गणेश काटे यांच्या बनावट सह्या केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाणेर पोलीस करीत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41

एकविरा आईच्या दर्शनाला निघालं दाम्पत्य अन् घरी परतलेच नाही; कुटुंबाची शोधाशोध, बेपत्ता तक्रार अन् २ दिवसांनी अचानक झुडुपात सापडलं…

Thursday, 22 October 2026, 18:38

दौंड तालुक्यातील पिलाणवाडीत विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरीला

Thursday, 22 October 2026, 18:24

भारताचा न्यूझीलंडमध्ये रेकॉर्डब्रेक विजय; २२६ रनचे लक्ष्य करत धडाकेबाज चेझ; न्यूझीलंडला त्यांच्याच घरात धूळ चारली

Thursday, 22 October 2026, 16:55
Next Post

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp