Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजितदादांच्या अपघातामागचं गूढ उलगडणार? मफलरवाल्या नेत्याबाबत 16 नोव्हेंबरला मोठा खुलासा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 13 November 2026, 22:56

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर एक रहस्यमय पोस्टर लावण्यात आले आहे.या पोस्टरवर तारीख आणि वेळेचा स्पष्ट उल्लेख असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

या निनावी बॅनरवर कोणाच्याही नावाचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, त्यावर एका मफलरचे चित्र रेखाटलेले दिसत असल्याने राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. ‘अजितदादांच्या अपघातामागील किंवा त्यातील घातपातामागील सूत्रधारांना पाठीशी घालणारा नेता कोण?’ असा थेट आणि बोचरा सवाल या पोस्टरद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.येत्या 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता या ठिकाणी नेमकं काय घडणार आणि कोणता नवा गौप्यस्फोट होणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे..

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. या अपघातात व्हीएसआर कंपनीला पाठीशी घालणारा ‘मफलरवाला नेता’ नेमका कोण आहे, याचा पर्दाफाश लवकरच केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. हा नेता छगन भुजबळ किंवा अरविंद केजरीवाल नसून दुसराच कोणीतरी असल्याचा दावा त्यांनी आधीच केला आहे.

या प्रकरणातील संबंधित नेत्याचे नाव 10 ऑक्टोबर रोजी जाहीर करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले होते. मात्र, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील सहभाग आणि त्यानंतर आलेले दसरा व दिवाळी यांसारखे मोठे सण यामुळे नाव जाहीर करण्यास विलंब झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर काही गूढ पोस्टर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे. हे पोस्टर रोहित पवार यांच्या सांगण्यावरूनच लावण्यात आले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, यामागचा खरा सूत्रधार कोण, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरील गूढ अधिकच वाढले आहे.

रोहित पवार यांनी याआधीही अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आता यशवंतराव चव्हाण सेंटरमधील पत्रकारिकेनंतर त्या मफलरवाल्या नेत्याचे खरे नाव समोर येणार का, आणि या विमान अपघातामागील सत्य उघड होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Thane News : डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवकाला तुरुंगातच त्रास! रमेश म्हात्रेंची प्रकृती खालावली

Friday, 13 November 2026, 23:08

अजितदादांच्या अपघातामागचं गूढ उलगडणार? मफलरवाल्या नेत्याबाबत 16 नोव्हेंबरला मोठा खुलासा!

Friday, 13 November 2026, 22:56

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांना नियमांचे बंधन! वस्त्रसंहितेसाठी एसओपी तयार होणार

Friday, 13 November 2026, 22:17

एसटी महामंडळात मेगा भरती! तब्बल 13,980 चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने होणार नियुक्ती

Friday, 13 November 2026, 21:32

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग? दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल्ल पटेलांची 35 मिनिटे गुप्त चर्चा!

Friday, 13 November 2026, 20:47

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना हक्काचं घर! 8 वारसांना मोफत घरे देण्याचा आयुक्तांचा आदेश

Friday, 13 November 2026, 20:12
Next Post

Thane News : डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवकाला तुरुंगातच त्रास! रमेश म्हात्रेंची प्रकृती खालावली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp