Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 5 June 2026, 20:14
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

मुंबई: मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांप्रमाणे विविध शैक्षणिक सवलती आणि योजनांचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Maratha Educational Benefits)

शासनाच्या नव्या निर्णयानुसार मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर 8 प्रमुख योजना लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये दहावीनंतरच्या शिक्षणासाठी दिली जाणारी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना मराठा विद्यार्थ्यांनाही उपलब्ध होणार आहे. तसेच इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती योजनाही या प्रवर्गाला लागू करण्यात आली आहे.

रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजनेचाही लाभ मराठा समाजातील तरुणांना दिला जाणार आहे. याशिवाय विविध शैक्षणिक शुल्क आणि इतर संबंधित खर्चाची प्रतिपूर्ती करण्याची योजनाही लागू करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे.

महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या आणि परराज्यातील अनुदानित किंवा विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही या योजनांचा लाभ घेता येणार आहे. तसेच राज्यातील सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींसाठी पात्र मानण्यात येणार आहे.

 

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर संस्थास्तरावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या सवलती लागू राहतील. त्यामुळे विविध कारणांमुळे नियमित प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा मिळू शकणार आहे.

या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भविष्यात ओबीसी प्रवर्गासाठी ज्या नव्या शैक्षणिक सवलती किंवा सुविधा जाहीर केल्या जातील, त्या स्वतंत्र आदेशाशिवाय मराठा समाजालाही आपोआप लागू होतील. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दीर्घकालीन स्वरूपात शैक्षणिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूर बायपास येथील अपघातांविरोधात प्रतीकात्मक तिरडी; प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध…..

Wednesday, 26 August 2026, 11:53

पुण्यात मद्यधुंद महिलेने मित्राला दगडाने ठेचून मारलं! कासारसाईला दोघं दारू प्यायला बसले किरकोळ वादातून त्याने हात पिरगाळला अन् तिचं डोकं सटकलं

Wednesday, 26 August 2026, 11:29

उजनी पाणलोटातील मच्छी तळी, मांगूर पालनाच्या तक्रारींची चौकशी करण्याची मागणी

Wednesday, 26 August 2026, 11:07

कोळविहिरे येथील घाटेमळ्यात भरदिवसा घरफोडी; 14 लाखांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Wednesday, 26 August 2026, 11:01

५० फुटावर रुग्णालय तरी घराच्या दारातच महिलेची अर्धवट प्रसूती; कण्हत, विव्हळत तिने मदत मागितली पण…आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार

Wednesday, 26 August 2026, 10:58

पुण्यात 11 वर्षांच्या मुलाकडून घरकाम; ‘भैया-दीदी’च्या नावाने आणले, शाळेऐवजी धुणी-भांडी अन् साफसफाई! नागरिकांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलाची सुटका

Wednesday, 26 August 2026, 10:07
Next Post

Tutoriel d’inscription Roulettino Casino : Directives pas à pas pour le Canada

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp