Thursday, August 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात 11 वर्षांच्या मुलाकडून घरकाम; ‘भैया-दीदी’च्या नावाने आणले, शाळेऐवजी धुणी-भांडी अन् साफसफाई! नागरिकांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलाची सुटका

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 August 2026, 10:07

पुणे, ता. 26 : बिहारमधून पुण्यात फिरण्यासाठी आणलेल्या अवघ्या 11 वर्षांच्या मुलाला शाळेत न पाठवता घरातील साफसफाई, डस्टिंग, बाथरूम धुणे, पोछा मारणे, चहा बनवणे तसेच पाय दाबून देण्यासारखी कामे करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार खराडीतील गेरा वर्ल्ड ऑफ जॉय सोसायटीत उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, सोसायटीतील नागरिकांनी मुलाची चौकशी केल्यानंतर त्याने आपण बिहारमधील असून ‘भैया-दीदी’सोबत राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाइन आणि पोलिसांशी संपर्क साधल्याने हा प्रकार समोर आला.

याप्रकरणी विधी संजयकुमार सक्सेना (वय 36 , रा. गेरा वर्ल्ड ऑफ जॉय, खराडी) यांनी पोलिसांकडे जबाब दिला आहे. त्यांच्या जबाबानुसार, अल्पवयीन मुलाचे नाव सुरुवातीला ‘मोनु’ असे सांगण्यात आले; मात्र पोलिसांच्या चौकशीनंतर त्याचे मूळ नाव हर्षितकुमार अजितकुमार (वय 11 वर्षे 2 महिने) असल्याचे समोर आले.

व्हॉट्सॲपवरील एका मेसेजने उलगडला प्रकार

22 ऑगस्ट रोजी सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नेहा सिंग यांनी एक लहान मुलगा बेपत्ता असल्याचा मेसेज आणि व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर सोसायटीतील नागरिक मुलाचा शोध घेत होते. काही वेळाने मनीष स्वर्णकर यांनी मुलगा सापडल्याचा मेसेज ग्रुपवर टाकला. त्यानंतर विधी सक्सेना सोसायटीच्या कार्यालयात गेल्या असता तेथे घाबरलेल्या अवस्थेत एक लहान मुलगा आढळून आला. नागरिकांनी त्याला पाणी व नाश्ता देऊन विश्वासात घेतल्यानंतर त्याने आपले नाव ‘मोनु’ असून तो बिहारचा असल्याचे सांगितले.

‘शाळेत जात नाही; डस्टिंग, चहा अन् साफसफाई करतो’

मुलाची अधिक चौकशी केली असता तो गेल्या एक-दोन महिन्यांपासून पुण्यात असल्याचे त्याने सांगितले. तो ‘भैया व दीदी’सोबत राहत असल्याचे आणि त्याचे आई-वडील बिहारमध्ये असल्याचे त्याने नागरिकांना सांगितले.‘शाळेत जातोस का?’ असा प्रश्न विचारल्यावर त्याने आपण शाळेत जात नसल्याचे सांगितले. तसेच ‘भैया-दीदी’ यांच्याकडे डस्टिंग, चहा बनवणे, झाडू-पोछा करण्याची कामे करत असल्याचे त्याने सांगितले. काम केले नाही तर ओरडले जात असल्याचेही त्याने सांगितल्याचे जबाबात नमूद आहे.

 

नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाइनला फोन केला

मुलगा यापूर्वीही हरवला असल्याची माहिती समोर आल्यानंतर विधी सक्सेना यांनी तत्काळ चाइल्ड हेल्पलाइन1098 वर संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. प्रतिसाद मिळण्यास विलंब झाल्यानंतर त्यांनी पुन्हा संपर्क साधला असता डायल 112 वर फोन करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी 112 वर फोन केला. काही वेळातच पोलिसांचे पथक सोसायटीत दाखल झाले आणि मुलाची चौकशी करण्यात आली.

पोलिसांसमोर मुलगा घाबरला; गंभीर आरोप

पोलिसांच्या चौकशीदरम्यान सोसायटीतील नागरिकांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला. त्यावेळी दिनदयाल नावाच्या व्यक्तीकडे पाहून मुलगा घाबरला. मुलाने पोलिसांसमक्ष, काम करण्यास सांगितले जाते, काम केले नाही तर ओरडले जाते, त्याची पत्नी मारहाण करते आणि कचरा उचलण्यास सांगितले जाते, असे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.

बिहारमधून पुण्यात आणले; शाळेऐवजी घरकाम

पोलिसांच्या सूचनेनुसार मुलाला घेऊन खराडी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्याचे आई-वडील छोटीदेवी आणि अजितकुमार यांना बिहारमधून पुण्यात बोलावण्यात आहे. त्यानंतर मुलाचे खरे नाव हर्षितकुमार अजितकुमार असल्याचे स्पष्ट झाले. मुलाच्या आई-वडिलांनी त्याला त्यांच्या ओळखीचे दिनदयाल यांच्यासोबत पुण्यात पाठविले होते. मात्र पुण्यात आल्यानंतर तो त्यांच्याकडे राहत होता आणि त्याला शाळेत न पाठवता फ्लॅटची डस्टिंग, बाथरूम साफ करणे, पोछा मारणे, चहा बनवणे आणि पाय दाबून देणे आदी कामे करून घेतली जात होती.

आई वाडिलांसह 6 जणांवर गुन्हा

याप्रकरणी दिनदयाल, त्यांची पत्नी नम्रता साही, शशिकांत कुमार, त्यांची पत्नी सोनम कुमार तसेच मुलाचे आई-वडील छोटीदेवी व अजितकुमार यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलाचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, 2015 – 75 ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(2),146 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे बालकापर्यंत पोहोचले मदतीचे हात

सोसायटीतील व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या बेपत्ता मुलाच्या संदेशाची नागरिकांनी गांभीर्याने दखल घेतली. मुलगा सापडल्यानंतर त्याची चौकशी करून त्याला विश्वासात घेण्यात आले आणि संशयास्पद बाबी लक्षात येताच चाइल्ड हेल्पलाइन १०९८ व डायल ११२ शी संपर्क साधण्यात आला. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या परिस्थितीची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा ‘तांडव’ ; राहिंज वस्तीत चिमुकल्यांसह 7 ते 8 जणांना घेतला चावा, 5 वर्षांच्या मुलाच्या डोक्याला चावल्याने पडले 7 टाके..

Thursday, 27 August 2026, 12:44

नेपाळमध्ये साताऱ्याच्या 10 महिला पर्यटक सुरक्षित; प्रशासनाच्या संपर्कात, पोखरातील हॉटेलमध्ये मुक्काम

Thursday, 27 August 2026, 11:49

‘आज तुझा गेम वाजवून टाकणार!’ म्हणत तरुणाला अडवले; धारदार हत्याराने हल्ल्याचा प्रयत्न, मांजरीत टोळक्यावर गुन्हा दाखल

Thursday, 27 August 2026, 11:10

कामाच्या ठिकाणी काळाचा कहर! पिंपरी-चिंचवडमध्ये दोन कामगारांचा दुर्दैवी अंत,परिसरात हळहळ

Thursday, 27 August 2026, 10:51

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; एक जिवंत काडतूस जप्त

Thursday, 27 August 2026, 9:44

केतन अग्रवाल हत्याकांडातील सिया गोयलला तुरुंगात VIP ट्रीटमेंट?; रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या आरोपांनी खळबळ, चौकशीची मागणी

Thursday, 27 August 2026, 9:35
Next Post

५० फुटावर रुग्णालय तरी घराच्या दारातच महिलेची अर्धवट प्रसूती; कण्हत, विव्हळत तिने मदत मागितली पण...आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp