Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 29 November 2026, 13:59

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात दुचाकी चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोहमार्ग पोलीस चौकीच्या अगदी समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. वर्दळीच्या ठिकाणी आणि थेट पोलीस चौकीसमोरच चोरी झाल्याने परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रमोद सोर (वय ४४, रा. कात्रज, पुणे) हे मध्य रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहेत. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.२५ ते सायंकाळी ७.३० या वेळेत त्यांनी आपली दुचाकी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील लोहमार्ग पोलीस चौकीसमोर पार्क केली होती.

काम संपवून परतल्यानंतर त्यांनी दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी पाहणी केली. मात्र, त्यांची गाडी तिथे दिसून आली नाही. शोध घेतल्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार नोंदवली.

पोलीस चौकीसमोरच दुचाकी चोरीला गेल्याने नागरिक आणि प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रेल्वे स्टेशनसारख्या वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. पोलीस चौकीसमोरून दुचाकी चोरून नेणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11

भोसरी येथे घराचा दरवाजा वाजविल्याचा जाब विचारताच तलवारीने हल्ला; बाप-लेकाच्या हत्येचा प्रयत्न, दोघे अटकेत

Sunday, 29 November 2026, 12:07
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp