Big News : मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी मोर्चा, साखळी उपोषण, सभा या मार्गाने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली असून, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार मंत्रालय परिसरात आक्रोश करताना दिसत आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाला कुलूप
मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी जोरदार मागणी आमदार करत आहेत. या मागणीसाठी मंत्रालयाला कुलूप लावण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंत्रालयात आंदोलन सुरू आहे. राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालय परिसरात आंदोलन करत आहेत. सर्वपक्षीय आमदारांनी भूमिका घ्यावी. (Big News) सरकारसमोर बाजू मांडावी, अशी मागणी सर्वसामान्य मराठा बांधव करत आहेत. सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी हे आंदोलक करत आहेत.
दरम्यान, अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनेज चरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. आंदोलकांच्या आग्रहावरून ते पाणी पीत आहेत. मात्र, आजच्या दिवसभरात सरकारने आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास पुन्हा एकदा जलत्याग करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (Big News) या पार्श्वभूमीवर आमदारांचे आंदोलन लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत.(Big News) त्यामुळे या बैठकीतून काय समोर येते. मराठा आरक्षणावर तोडगा निघतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी तुम्हीच… मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात