राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : यवत येथील दोरगेवाडी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून ‘सही पोषण, देश रोशन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा महिना दरवर्षी पोषण मास म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी दोरगेवाडी येथील अंगणवाडी केंद्रातील पालक संगिता गणपत पाखरे यांच्या घरी गौरी-गणपती स्थापना करण्यात आली होती. या निमित्ताने गौरींना अंगणवाडीत ‘सही पोषण, देश रोशन’ या माध्यमातून गुलाबी व पिवळ्या रंगाच्या साड्या नेसवण्यात आल्या. तसेच पोषण आहाराचे फलक लावून गौरीची सजावट करण्यात आली. या उपक्रमाची महती सर्वांपर्यंत पोहोचावी, हा यामागील उद्देश होता.
पोषण आहाराविषयी जनजागृती
या वेळी पटांगणात देखील ‘सही पोषण, देश रोशन’ याविषयी रांगोळी काढून, पालेभाज्या व फळभाज्यांनी सजावट करण्यात आली होती. अंगणवाडी सेविका संध्या रविंद्र शिंदे व मनिषा राजाराम गायकवाड यांनी अंगणवाडीतील मुला-मुलींसह गौरी व गणपतीची आरती केली. (Yavat News ) या वेळी आलेल्या सर्व महिला व पालकांना आहारविषयी जनजागृती करण्यात आली. समृद्धी गरड या चिमुकलीने पालेभाज्यांचे व फळांचे महत्व सांगितले.
शुभांगी दोरगे, प्राची दोरगे, सायली दोरगे यांनी आकर्षक रांगोळी रेखाटली होती. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या शितल दोरगे, संगीता दोरगे, वैभवी दोरगे यांसह (Yavat News ) दोरगेवाडी अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व परिसरातील महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : जिरेगावातील २०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Yavat News : यवत पोलीस स्टेशनतर्फे शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन