भरत रोडे
Shirur News : कवठे येमाई : पारनेर तालुका ते शिरूर तालुक्याला जोडणारा रस्ता तयार झाला असून दळणवळण वाढण्यासाठी पारनेर ते देवीभोयरे फाटा – निघोज – टाकळी हाजी मार्गे रांजणगाव गणपती दरम्यान एसटी शटल बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लवकरच याबाबत पारनेरचे आमदार निलेश लंके यांना निवेदन दिले जाणार आहे.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांना निवेदन देणार
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती हे आठवे महागणपती म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यातून भावी या ठिकाणी दर्शनासाठीगर्दी करताना दिसतात. त्या प्रकारे शिरूर- पारनेर च्या सरहद्दीवर श्री मळगंगा देवी व जगप्रसिद्ध रांजणखळगे आहेत. (Shirur News) त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावीक व पर्यटक दर्शनासाठी पर्यटनासाठी गर्दी करतात. या परिसरात ये- जा करण्यासाठी खाजगी वाहनांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पारनेर ते देवीभोयरे फाटा – निघोज – टाकळी हाजी मार्गे रांजणगाव गणपती दरम्यान एसटी शटल बस सेवा सुरू केल्यास प्रवाशांची समस्या नाहिशी होईल.
पारनेर – वडझिरे- देवीभोयरे फाटा – वडगाव गुंड – निघोज – टाकळी हाजी – आमदाबाद या भागातील अनेक नागरिक विद्यार्थी तरुण-तरुणी हे रांजणगाव एमआयडीसी येथे नोकरी निमित्ताने ये जा करत असतात. तसेच पुणेवाडी परिसरातील भैरवनाथ मंदिर, निघोज येथील मळगंगा देवी देवस्थान निघोज – टाकळी हाजीचे रांजणखळगे अष्टविनायक रांजणगाव गणपती आदी तीर्थक्षेत्र आहेत. (Shirur News) या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात परंतु या ठिकाणी सार्वजनिक बस सेवा नसल्याने भाविकांची तसेच नागरिक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
दरम्यान, पीएमपीएमएलची पुण्यावरून रांजणगाव कारेगाव एमआयडीसी भागासाठी २० मिनिटाला बससेवा सुरू आहे. रांजणगाव गणपती येथे आपल्या भागातील कामगार, विद्यार्थी व नागरिकांना घरी येण्या – जाण्या साठी बससेवा उपलब्ध नाही. या परीसरात बससेवा सुरू झाली तर प्रवासाची समस्या सोडविण्यास मदत होईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : Shirur News : टाकळी हाजीकरांकडून ग्राम स्वच्छता अभियान..
Shirur News : नगर कल्याण महामार्गावर आदिवासी समाजाकडून चक्काजाम आंदोलन..