Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अहमदाबाद विमान अपघातात सुनील तटकरे यांच्या कुटुंबियांसह माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील अन्य पाच जण मृत्युमुखी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 12 June 2025, 17:46

अहमदाबाद: एअर इंडियाच्या AI171 या प्रवासी विमानाचा आज दुपारी एक वाजून ३८ मिनिटांनी गुजरातच्या अहमदाबाद शहरात भीषण अपघात झाला. अहमदाबादहून लंडनकडे निघालेलं हे विमान टेक ऑफनंतर काही मिनिटांतच रहिवासी भागात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या विमानात २३० प्रवासी आणि १२ केबिन क्रू सदस्य होते. प्राथमिक माहितीनुसार, सर्व २४२ जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांचा समावेश
या दुर्घटनेत महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश होता. यामध्ये अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी सोनघरे या तीन महिला केबिन क्रूच्या रूपात कार्यरत होत्या, तर महादेव पवार, आशा पवार आणि मयुर पाटील हे प्रवासी होते. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असून, त्या तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नी आहेत. विशेष म्हणजे, अपर्णा यांचे पतीही एअर इंडियामध्ये कार्यरत आहेत.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा समावेश
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांचाही समावेश होता. ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांची पत्नी लंडनमध्ये मुलीसोबत आधीच होती, तर मुलगा अमेरिकेहून कौटुंबिक कार्यक्रमासाठी लंडनमध्ये दाखल झाला होता. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे.

AI171 या एअर इंडिया विमानात एकूण २३० प्रवासी होते. यामध्ये सर्वाधिक १६९ प्रवासी हे भारतीय नागरिक होते. त्याखालोखाल ५३ प्रवासी ब्रिटीश नागरिक होते. तसेच, या विमानात पोर्तुगालचे ७ नागरिक आणि कॅनडाचा १ नागरिकही प्रवास करत होता. विशेष म्हणजे, या विमानात दोन लहान मुलांचाही समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तांत्रिक बिघाडाचं कारण?
सूत्रांच्या माहितीनुसार, या विमानात मागील दोन दिवसांपासून तांत्रिक बिघाड आढळला होता, त्यामुळे ते अहमदाबादमध्येच थांबवण्यात आले होते. आज अखेर टेक ऑफची परवानगी मिळाल्यानंतर हे विमान हवेत झेपावले, पण काही क्षणांतच ते तांत्रिक कारणामुळे कोसळले अशी शक्यता व्यक्त होत आहे. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले, परंतु कोणत्याही जीवितहानीपासून बचाव होऊ शकला नाही.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

daund crime

Daund News : दौंडमध्ये लहान मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी ; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल तर तर दुसऱ्या बाजूने विनयभंगाची तक्रार

Monday, 27 April 2026, 16:39

Pune News : पुण्यातील हांडेवाडीत लहान मुलींना गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न ; विरोध करणाऱ्या भावंडांना बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:54
daund crime

Daund Fraud News : दौंडमध्ये ऊसतोड मजुरांच्या नावाखाली शेतकऱ्याला 7 लाखांचा गंडा ; मुकादमावर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:51

Pune News : उरुळी देवाची येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून 6 लाखांहून अधिक ऐवज लंपास..

Monday, 27 April 2026, 13:41
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Fursungi News : “आयटी इंजिनिअर महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ ; 5 जणांवर गुन्हा दाखल..

Monday, 27 April 2026, 13:37

‘समर्थ क्रॉप केअर’चा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळीसह त्याच्या 9 साथीदारांवर नगर जिल्ह्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 12:55
Next Post

Ahmedabad Plane Crash: विमानाचा भाग हॉस्टेल मेसवर कोसळला; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची प्राथमिक माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.