Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यातील हांडेवाडीत लहान मुलींना गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न ; विरोध करणाऱ्या भावंडांना बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 April 2026, 13:54

Pune News : फुरसुंगी, ता. 17 : हांडेवाडी येथील फॉर्च्युन इंप्रेस सोसायटीमध्ये एकाच वेळी धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीत खेळणाऱ्या लहान मुलींना परवानगीशिवाय गाडीत बसवून बाहेर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकाराला आक्षेप घेतल्यावर संबंधित व्यक्तीसह त्याच्या साथीदारांनी दोन भावंडांना बेदम मारहाण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सोसायटीतील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Pune News

शुभम बाचकर, किरण पवार श्रावण मोडक व एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश पांडुरंग गायकवाड (वय 27) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश गायकवाडहे आपल्या कुटुंबासह फॉर्च्युन इंप्रेस सोसायटी, हांडेवाडी येथे वास्तव्यास असून ते वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करतात. Pune News

रविवारी (ता.26 एप्रिल) सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या बहिणीची चार वर्षांची मुलगी गार्गी ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये इतर मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी गणेश गायकवाड तिच्यावर लक्ष ठेवून होते. अचानक गार्गी दिसेनाशी झाल्याने त्यांनी घाईघाईने तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना सोसायटीत राहणारा शुभम बाचकर हा आपल्या कारमध्ये गार्गी आणि आणखी एका मुलीला बसवून गेटच्या दिशेने निघालेला दिसला. Pune News

परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी आपल्या मोठ्या भावाला संतोष याला गाडी अडवण्यास सांगितले. गेटवर गाडी थांबवून त्यांनी आरोपीला जाब विचारला असता “मुलींना आईस्क्रीम खायला घेऊन जात होतो,” असे उत्तर देत त्याने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करत गायकवाड बंधूंनी त्याला रोखले. यावरून वाद चिघळत गेला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्याचवेळी सोसायटीतीलच किरण पवार, त्याचा साथीदार श्रावण मोडक आणि एक अनोळखी इसम घटनास्थळी आले. त्यांनी उलट गायकवाड बंधूंनाच दमदाटी करत शिवीगाळ सुरू केली. Pune News

 

वाद वाढताच, श्रावण मोडक याने गणेश गायकवाड यांना बेल्टने बेदम मारहाण केली, तर अनोळखी इसमाने वॉचमनच्या काठीने आणि छत्रीच्या दांड्याने हल्ला केला. गणेश यांचा भाऊ संतोष हा त्यांना वाचवण्यासाठी पुढे आला असता किरण पवार याने त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता “जिवे मारून टाकतो” अशी धमकी देत चौघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. Pune News

या घटनेनंतर घाबरलेल्या नागरिकांनी 112 नंबरवर फोन केला. तत्काळ फुरसुंगी पोलिसांचे मार्शल पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी भावंडांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी शुभम बाचकर, किरण पवार, श्रावण मोडक आणि एका अनोळखी इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम 115(2), 118(1), 3(5), 351(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post
daund crime

Daund News : दौंडमध्ये लहान मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी ; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल तर तर दुसऱ्या बाजूने विनयभंगाची तक्रार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp