Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 1 September 2026, 20:06

पुणे: महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आक्रमक भूमिका घेतलेल्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील कारवाईला व्यापाऱ्यांकडून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आहे. व्यापारी आणि ग्राहक या दोघांचे हित लक्षात घेऊन सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीसाठी आता एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, या कालावधीनंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसून संबंधितांना नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

राज्यात भेसळयुक्त दूध, पनीर, खवा यासह विविध खाद्यपदार्थांविरोधात एफडीएकडून कारवाई सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत सुट्या किंवा पॅकिंगशिवाय विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या विक्रीवरही कठोर भूमिका घेण्यात आली होती. सुट्या तेलामध्ये भेसळ होण्याची शक्यता अधिक असते. तसेच ग्राहकांना तेलाचा स्रोत, गुणवत्ता आणि त्यात कोणते घटक मिसळले आहेत, याची माहिती सहज मिळत नाही. तपासणीमध्ये चुकीचे लेबल, भेसळ, परवान्याशिवाय व्यवसाय आणि अयोग्य साठवणुकीसारख्या बाबी आढळल्याने एफडीएने हा निर्णय घेतला होता.

मात्र, या निर्णयामुळे लहान व्यापारी आणि पारंपरिक तेल विक्रेत्यांमध्ये चिंता निर्माण झाली. अनेक गरीब आणि कामगार वर्गातील ग्राहक आजही सुटे तेल खरेदी करतात. त्यामुळे अचानक निर्बंध लागू केल्यास त्याचा परिणाम व्यापारी आणि ग्राहक दोघांवर होण्याची शक्यता होती.

या पार्श्वभूमीवर सुट्या तेलाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर सरकारने सध्याच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी एक वर्षाची मुदत दिली आहे. या काळात व्यापाऱ्यांना आवश्यक बदल करण्याची संधी मिळणार आहे.

 

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अन्नाची गुणवत्ता आणि ग्राहकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. मात्र, कायद्याची अंमलबजावणी करताना पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही अडचणी येऊ नयेत, यासाठी मार्ग काढला जाईल. त्यासाठी एफडीए आणि व्यापाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. कायद्याचे पालन करण्यासाठी व्यापाऱ्यांना कोणते बदल करावे लागतील, याबाबत ही समिती मार्गदर्शन करणार आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएकडून हॉटेल, रेस्टॉरंट आणि विविध खाद्य व्यवसायांची तपासणी सुरूच आहे. वारंवार गरम केलेल्या तेलाच्या वापराबाबतही प्रशासनाने व्यवसायिकांना सावध केले असून, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58

‘ओल्ड मंक’ प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

Wednesday, 2 September 2026, 19:16
Next Post

'मला तुझा मित्रच समज' म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp