Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ओल्ड मंक’ प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 2 September 2026, 19:16

पुणे: ओल्ड मंक रमच्या विक्रीवरील बंदीमुळे महाराष्ट्रातील मद्यप्रेमींमध्ये नाराजी असतानाच या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. ओल्ड मंकची निर्मिती करणाऱ्या मोहन मीकीन कंपनीने विक्रीवरील बंदी उठवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने कंपनीला सध्या कोणताही अंतरिम दिलासा दिलेला नाही.

ओल्ड मंकच्या काही प्रकारांच्या घटकांबाबत आणि लेबलिंगबाबत अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) आक्षेप घेतला होता. त्यानंतर महाराष्ट्रात या उत्पादनाच्या विक्रीवर निर्बंध आले. या निर्णयाविरोधात कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली.

सुनावणीदरम्यान ओल्ड मंकच्या बाटलीवरील ‘7 Years Old’ या उल्लेखावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. या उल्लेखामुळे संपूर्ण रम सात वर्षे जुनी असल्याचा ग्राहकांचा गैरसमज होऊ शकतो, अशी शक्यता न्यायालयाने व्यक्त केली. तसेच उत्पादनामध्ये वापरण्यात येणाऱ्या फ्लेव्हर्सचा उल्लेख बाटलीवर अत्यंत लहान अक्षरात असल्याबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणात कंपनीने लेबलमध्ये बदल करण्याची तयारी दर्शवली आहे. बाटलीवरील ‘7 years old blended’ हा उल्लेख हटवण्याबरोबरच फ्लेव्हर्सचा उल्लेख स्पष्टपणे करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.

 

दरम्यान, कंपनीच्या वतीने वापरण्यात येणारे फ्लेव्हर्स नियमांनुसार मान्य असल्याचा दावा करण्यात आला. तसेच इतर ब्रँडमध्येही अशा प्रकारे फ्लेव्हर्सचा वापर होत असल्याचे कंपनीकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

मात्र, न्यायालयाने महाराष्ट्रातील विक्रीबंदीला तूर्तास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ओल्ड मंकची राज्यातील विक्री सध्या बंदच राहणार आहे. कंपनीने लेबलिंगमध्ये आवश्यक बदल केल्यानंतर पुढील सुनावणीत या प्रकरणाचा काय निर्णय होतो, याकडे मद्यविक्रेते आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58

‘ओल्ड मंक’ प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

Wednesday, 2 September 2026, 19:16

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39
Next Post

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp