Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारताचा न्यूझीलंडमध्ये रेकॉर्डब्रेक विजय; २२६ रनचे लक्ष्य करत धडाकेबाज चेझ; न्यूझीलंडला त्यांच्याच घरात धूळ चारली

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 22 October 2026, 16:55

नवी दिल्ली : भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात दणक्यात केली आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडने दिलेल्या २२६ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत चार विकेट्सने विजय मिळवला. संजू सॅमसन, कर्णधार श्रेयस अय्यर आणि नमन धीर यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

संजू सॅमसनची वादळी खेळी

क्राइस्टचर्च येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत चार विकेट्स गमावून २२५ धावा केल्या. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी २२६ धावांचे मोठे लक्ष्य होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ५.५ षटकांत ९३ धावांची भागीदारी केली. अभिषेकने १२ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या, तर संजू सॅमसनने ३३ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६७ धावांची तुफानी खेळी साकारली.

लागोपाठ विकेट्स पडल्याने वाढली धाकधूक

सलामीवीर बाद झाल्यानंतर तिलक वर्मा सहा धावांवर, तर इशान किशन एका धावेवर माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला. मात्र, कर्णधार श्रेयस अय्यरने २८ चेंडूंमध्ये ४२ धावा करत डावाला आकार दिला. अक्षर पटेलनेही १४ चेंडूंमध्ये २४ धावांचे योगदान दिले.

 

नमन धीर ठरला विजयाचा शिल्पकार

भारताच्या विजयात नमन धीरची खेळी निर्णायक ठरली. संघाला धावांची गरज असताना त्याने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला. नमनने अवघ्या १५ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा केल्या.

त्याच्या फटकेबाजीमुळे भारताने दोन चेंडू राखून लक्ष्य गाठले आणि चार विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वासही वाढला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अन् तो गर्लफ्रेंडच्या मृतदेहाजवळ बसून २ तास रडला! पहिले खून नंतर पश्चाताप; तिच्या वागण्याला कंटाळून त्यानं गळा आवळला; तिच्या छातीवर दगड…

Friday, 23 October 2026, 18:56

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला धक्कादायक वळण! जीवाभावाचे तीन मित्रच संशयाच्या भोवऱ्यात; दौंडच्या ढाब्यावर २ लाखांची सुपारी दिल्याचा संशय; हल्ल्यानंतर रुग्णालयातही मित्रांची उपस्थिती, आतापर्यंत ५ जणांना अटक

Friday, 23 October 2026, 18:47

प्रतिक्षा संपली! PM किसानच्या हफ्त्याची तारीख जाहीर ; दिवाळीआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात ₹ 2000 जमा होणार?

Friday, 23 October 2026, 18:08

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात महत्वाची अपडेट! सुनेत्रा पवारांच्या दोन निकटवर्तीयांना धडाधड नोटिसा,चौकशी होणार?

Friday, 23 October 2026, 17:48

‘वकील आहे तर तोफ आहे का? थांब तुला ढगात पाठवतो’ म्हणत पुण्यात वकिलावर जीवघेणा हल्ला; धमकी देत डोक्यात रॉड घातला अन्…

Friday, 23 October 2026, 17:34

दिवाळी शॉपिंगसाठी पुणेकरांना मोठी संधी! कपडे, आकाशकंदील ते डेकोरेशन; खरेदीसाठी पाहा 5 स्वस्त मार्केट्स…

Friday, 23 October 2026, 17:22
Next Post

दौंड तालुक्यातील पिलाणवाडीत विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरीला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp