पुणे : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजासाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. जून महिन्यात या योजनेचा 23 वा हप्ता वाटप केल्यानंतर आता 24 व्या हप्त्याचे वेध लागले आहेत.,आता पात्र शेतकर्यांच्या खात्यात 30 ऑक्टोबर 2026 रोजी 2000 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ही केवळ संभाव्य तारीख असून याविषयी कोणतीही अधिकृत सरकारी घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकर्यांनी निश्चित माहितीसाठी योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट देणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारतर्फे या योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी एकूण 6000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. ही मदत प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात (DBT द्वारे) वर्ग केली जाते. अनुदानाचा लाभ विनाअडथळा मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे.नियमित हप्ता मिळण्यासाठी e-KYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी पीएम किसानच्या संकेतस्थळावरून OTP द्वारे किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने e-KYC करू शकतात.

तसेच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले (Aadhaar Seeding) असावे आणि त्यावर DBT सुविधा सुरू असणे आवश्यक आहे. जमिनीचा तपशील आणि भू-सत्यापन योजनेच्या नियमांनुसार योग्य असणे गरजेचे आहे. कागदपत्रांमधील कोणत्याही चुकीमुळे हप्ता रडू शकतो. त्यामुळे सर्व शेतकर्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपली लाभार्थी स्थिती वेळेवर तपासून घ्यावी.

सरकारी पातळीवरून अधिकृत घोषणा होईपर्यंत 30 ऑक्टोबरला पैसे जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.






