Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 2 September 2026, 20:15

पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या प्रकरणातील आदेश लवकर मिळवून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पुरंदर तहसील कार्यालयातील क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने रंगेहाथ पकडले. विजय मल्हारी खळदकर (वय 57, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीच्या असमान हिस्स्याबाबतचे प्रकरण तहसीलदार, पुरंदर यांच्या न्यायालयात सुरू होते. 24 जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यात आली होती. दोन्ही बाजूंना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, संबंधित आदेश अद्याप देण्यात आलेला नव्हता.

या आदेशाबाबत विचारणा करण्यासाठी तक्रारदार 29 ऑगस्ट रोजी पुरंदर तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांची भेट क्लार्क विजय खळदकर यांच्याशी झाली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, प्रकरण तहसीलदारांसमोर ठेवण्यासाठी सुरुवातीला पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी 2 सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यावेळी संबंधित प्रकरणाचा आदेश तहसीलदारांकडून मिळवून देण्यासाठी खळदकर यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पुणे युनिटने सापळा रचला. पंचांसमक्ष 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना खळदकर यांना तहसील कार्यालयासमोरील रोहित हॉटेलजवळ, सासवड येथे रंगेहाथ पकडण्यात आले.

 

या कारवाईचे नेतृत्व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांनी केले. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा पथकात पोलीस हवालदार बाळासाहेब गदादे, पोलीस हवालदार दीपक काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवी दिवेकर यांचा समावेश होता. हे तिघेही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे नियुक्त आहेत.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक-1 अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईनंतर विजय खळदकर हे शासकीय कर्मचारी नसून संबंधित कार्यालयात काम करणारे खाजगी व्यक्ती असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7(अ) अंतर्गत सासवड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितली जात असल्यास किंवा भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या 'शरद मॅंगो'ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp