Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 1 September 2026, 23:03

बीड: बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधवांकडून आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे. सरकारकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगी येथे टायर जाळून सरकारचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातील विविध भागांतून मराठा समाजाकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. याच मागणीसाठी पाडळशिंगी टोलनाक्याजवळ काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

रस्त्यावर टायर जाळल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक थांबली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. आंदोलनामुळे पाडळशिंगी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर बीडसह राज्यातील विविध भागांतील मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना होत असल्याची माहिती आहे. ५ ते १२ सप्टेंबरदरम्यान मुंबईत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आल्याचे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितले.

 

मुंबईकडे जाण्यासाठी अनेकजण मोटारसायकल, ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक तसेच बैलगाडीचा वापर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. उपलब्ध होईल त्या वाहनाने मुंबई गाठण्याचे नियोजन आंदोलकांकडून केले जात आहे.

मुंबईत पोहोचल्यानंतर काही आंदोलक नातेवाईक किंवा परिचितांकडे मुक्काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच वाहनांसाठी उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.

जरांगे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आगामी काळात मुंबईत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पाडळशिंगी येथील आंदोलनानंतर प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

Daily Horoscope: 2 सप्टेंबरला नशिबाची साथ कोणाला? पैसा आणि करिअरबाबत 12 राशींचे संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp