Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 15 October 2026, 18:23

मुंबई: महाराष्ट्रात २०२४ पासून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र, योजनेतील नियम आणि केवायसी प्रक्रियेमुळे काही महिलांचे अनुदान बंद झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिलांनाही केवायसीच्या कारणास्तव योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे नाराज झालेल्या महिलांनी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाते. या पैशांचा उपयोग अनेक महिला घरखर्च, दैनंदिन गरजा आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी करतात. मात्र, पात्र असूनही केवायसी प्रक्रियेच्या कारणामुळे अनुदान बंद झाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे आंदोलक महिलांचे म्हणणे आहे.

जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली महिलांनी या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली आहे. केवळ केवायसीच्या कारणामुळे पात्र महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी त्यांनी केली. तसेच योजनेतील अटी आणि शर्ती रद्द करून बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सरकारने महिलांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. पात्र महिलांचे बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करावे आणि त्यांना योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, सरकारने या मागण्यांची दखल घेतली नाही, तर येत्या २६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलक महिलांनी दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार या मागण्यांबाबत काय भूमिका घेते आणि बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर! तब्बल 879 रुग्णांची नोंद,आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली…

Friday, 6 November 2026, 10:39

पोलीस भरती घोटाळा उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ऑडिओ क्लिपने खळबळ, घोटाळ्याचे धागेदोरे कुठंपर्यत?

Friday, 6 November 2026, 10:23

दोन वर्षांसाठी पुण्यातून हद्दपार, तरीही परतला! वाघोलीत कोयते घेऊन दहशत माजवणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Friday, 6 November 2026, 10:20

दिवाळीच्या आनंदावर अपघाताचं विरजण! घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींच्या बसला अपघात, 15 जण जखमी

Friday, 6 November 2026, 10:14

इंदापूरमध्ये बांधकामस्थळी तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Friday, 6 November 2026, 10:06

TCS धर्मांतर प्रकरणात राजकीय कनेक्शन? इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश

Friday, 6 November 2026, 8:54
Next Post

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp