Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 15 October 2026, 17:44

उरुळी कांचन, दि. 13 : पूर्व हवेलीसाठी वरदान ठरलेला मुळा मुठा कालवा शेतकऱ्यांच्या बांधाच्या शेजारून दुथडी भरून वाहतोय. मात्र विजेअभावी शेतात उरली सुरली पिके सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर आता विजेचे संकट उभे ठाकले आहे.

यंदा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडल्याने ऊसापासून ते इतर नगदी पिके करपून चालली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, शिंदवणे, व परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत.

विजेअभावी शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने ऐन हिवाळ्यात कडक उन्हामुळे शेतातील पिके सुकू लागली आहे. त्यामुळे नर्सरी उद्योगासह शेतीचे अतोनात नुकसान या खंडीत प्रवाहाने होत असून व्यावसायिक ग्राहकाचे मोठे नुकसान अटळ असून योग्य दाबाने सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. दोन आठवड्यांपासून 35 वर पोहोचलेला पारा, उन्हाच्या दाहकतेने भेगाळणाऱ्या जमिनी, महावितरणचा आठ तास वीजपुरवठा मात्र त्यातही वारंवार लोडशेडिंग यामुळे पुरेशी जमीन भिजत नसल्याने करपत चाललेली पिके ही भयाण वास्तवता सध्या शिवारात आहे.

दरम्यान, वाढत्या उन्हासह महावितरणच्या दुजाभावामुळे कालवा व नदीकाठच्या गावांतील पिके, जनावरे व शेतकरी होरपळून निघत आहेत. शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, पंप नादुरुस्त होत आहेत. वीज वितरण कंपनी मात्र खंडित वीजपुरवठ्याबाबत मौन बाळगून आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वैतागले असून विजेच्या लपंडावामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

 

दरम्यान, उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे पिके करपू लागली आहेत. भारनियमन, दुरुस्तीच्या कामामुळे वीजप्रवाह वारंवार खंडित होण्याचे प्रमाण आणि बाकी इतर कारणांमुळे कायमच वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे भारनियमनाच्या संकटाबरोबर इतर दुरुस्तीच्या संकटांशी शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत असून, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वीजप्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करू लागले आहेत.

पाणी मुबलक प्रमाणात असून सुद्धा लाईटच्या सतत लपंडावामुळे फलबागा भाजीपाला, ऊस पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. दिवसा लाईट अजिबात राहत नाही. महावितरण कंपनीने विजेचा प्रश्न तात्काळ सोडवावा.
-सचिन विठ्ठल महाडिक, शेतकरी, शिंदवणे, (ता. हवेली)

“परिसरातील लोड तोडण्यासाठी काम सुरु आहे. शिंदवणे फिडरसाठी नवीन सब स्टेशनच्या जागेसाठी पाठपुरावा सुरु आहे. नवीन फिडरचे काम सुरु झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. महिनाभरात फीडरचे काम सुरु होणार असून वीजपुरवठा चांगला होईल. क्यापेसीटर नवीन फिडर टाकणे याची कामे सध्या सुरु आहेत. त्यामुळे पुढील काळात लाईटच्या समस्या जास्त उद्भवणार नाहीत.
-महेश धाडवे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, उरुळी कांचन (ता. हवेली)

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54
Next Post

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई - वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp