Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 1 September 2026, 22:00

शिरूर: हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे व चुकीच्या उपचारपद्धतीमुळे पूजा गई (वय-२७) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत पती राहुल देवीदास गई यांनी मंगळवारी (ता.१) शिरूर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी. या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान पुढील १५ दिवसांत न्याय न मिळाल्यास कोळपे हॉस्पिटलसमोर आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा राहुल गई यांनी दिला आहे.

पूजा राहुल गई यांना हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी ६ ऑगस्ट २०२६ रोजी शिरूर परिसरातील बाबुराव नगर येथील कोळपे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप राहुल गई यांनी केला आहे. या घटनेनंतर प्रकरणाची चौकशी सुरू असून, तब्बल एक महिना उलटला आहे.दरम्यान पूजा गई यांच्या मृत्यूनंतर ससून रुग्णालयात ऑन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले होते. तरी अद्याप अंतिम वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई रखडल्याने राहुल गई यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘पत्नीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला? आणि त्याला कोण जबाबदार आहे? याचा निष्पक्ष तपास होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी भूमिका घेऊन राहुल गई यांनी प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र,निष्पक्ष आणि तज्ज्ञ वैद्यकीय समितीमार्फत सखोल चौकशी करावी, उपचारादरम्यान झालेल्या कथित हलगर्जीपणा व निष्काळजीपणास जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. कोळपे हॉस्पिटलवर प्रशासकीय कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय व योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी राहुल गई यांनी केली आहे.

पोलिसांची आंदोलनकर्त्यांशी भेट

दरम्यान,आंदोलनस्थळी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके यांनी राहुल गई यांची भेट घेऊन चर्चा केली. शवविच्छेदनाचा अंतिम वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी संबंधित विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वैद्यकीय अहवाल लवकरात-लवकर उपलब्ध करून देण्याची सूचना केली.

 

मात्र,केवळ आश्वासनावर समाधान न मानता ठोस कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका राहुल गई यांनी घेतली आहे. पुढील १५ दिवसांत प्रशासनाने या प्रकरणात ठोस निर्णय घेऊन दोषींवर कारवाई केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गई यांनी दिला आहे.

या प्रकरणातील अंतिम वैद्यकीय अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून,अहवालानंतर प्रशासन आणि पोलीस कोणती भूमिका घेतात.याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! गणेश विसर्जनानिमित्त धायरी, मुंढवा अन् हडपसरमध्ये मोठे वाहतूक बदल

Wednesday, 23 September 2026, 17:59

दुष्काळात लावणीचा धुरळा! गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून भाजप नेते वादाच्या भोवऱ्यात,लाखोंची उधळण?

Wednesday, 23 September 2026, 17:45

किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर; युवराज काकडे यांची माहिती

Wednesday, 23 September 2026, 17:38

दिशा सालियन प्रकरणात विनायक राऊतांचा संताप अनावर; वडिलांवर गंभीर आरोप,. ‘मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी……..

Wednesday, 23 September 2026, 17:07

सोरतापवाडी येथील ‘नीलकंठ मोटर्स’ मधून जुनी कार घेतली अन् डेंटिंग-पेंटिंगच्या नावाखाली परस्पर विकली; उरुळी कांचन पोलिसांत एकावर गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 16:44

पेठ येथे विहिरीवरील मोटार सुरू करण्यावरून लोखंडी टाच्याने मारहाण ; चुलते व चुलत भावाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 16:36
Next Post

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp