Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘समर्थ क्रॉप केअर’चा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळीसह त्याच्या 9 साथीदारांवर नगर जिल्ह्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 April 2026, 12:55

श्रीगोंदा, ता. 27 : श्रीगोंदा तालुक्यात ‘समर्थ क्रॉप केअर’ कंपनीच्या नावाखाली राबवण्यात आलेल्या कथित गुंतवणूक घोटाळ्याला मोठे वळण मिळाले आहे. तब्बल १० टक्के मासिक परताव्याचे आमिष दाखवत हजारो नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार प्रशांत अनिल गवळीसह ९ जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘समर्थ क्रॉप केअर’चा मुख्य सूत्रधार प्रशांत अनिल गवळी, त्याची पत्नी ज्योती प्रशांत गवळी, अमृता प्रकाश सुपेकर, नागनाथ धोंडिबा जाधव, नवनाथ दगडू जाधव, सुदामदास प्रकाश मांगणे, चंद्रकांत राऊत, नागेश नामदेव जगताप, आविष्कार सुरवसे व मनीषा सुदाम दास अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गुंतवणूकदार विक्रांत प्रशांत जाधव यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने जादा परताव्याचे आमिष दाखवत श्रीगोंदा तालुक्यातील शेकडो गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. विक्रांत जाधव यांची तब्बल १८ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हा घोटाळा केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित नसून पुणे, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांसह राज्यभर पसरलेला असल्याचे चित्र आहे.

 

‘समर्थ क्रॉप केअर’ टोळीने राज्यातील १२ हून अधिक जिल्ह्यांतील सुमारे ४० ते ४५ हजार गुंतवणूकदारांकडून ४ ते ५ हजार कोटी रुपयांची बेकायदेशीर रक्कम गोळा केल्याचा गंभीर आरोप आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये कंपनी आर्थिक अडचणीत गेल्यानंतर गुंतवणूकदारांना एक रुपयाही परत मिळालेला नाही. उलट, “लवकरच पैसे मिळतील” अशी आश्वासने देत वेळकाढूपणा केल्याचे आरोप आहेत.

या प्रकरणात आधीच पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे शहर पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा यांनी प्रशांत गवळीला अटक केली होती. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलिसांनीही सुमारे ४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी त्याला ताब्यात घेतले होते. मात्र, या घोटाळ्यातील इतर आरोपी मोकाट असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अखेर श्रीगोंद्यातील गुन्हा दाखल झाल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, फसवणुकीच्या या महाघोटाळ्याचे राज्यभरात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. १०% परताव्याच्या गोड बोलांनी हजारो नागरिकांना आर्थिक खाईत ढकलणाऱ्या या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. “झटपट नफा” या आमिषामागील धोका पुन्हा एकदा समोर आला असून, अशा योजनांपासून सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Fursungi News : “आयटी इंजिनिअर महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ ; 5 जणांवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.