Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 June 2026, 19:13

राहुलकुमार अवचट

यवत : चौफुला परिसरात गावठी पिस्टलचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना यवत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली. आरोपींकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून न्यायालयाने दोघांना 15 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मयूर दत्तू पाटील (वय 26) आणि पवन कल्लू बर्मी (वय 21, दोघे रा. पिंपळवाडी रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील बोरीपारधी गाव हद्दीतील रेणुका कला केंद्र परिसरात ही घटना घडली. आरोपींनी बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगून सोमनाथ छगन माने (वय 30, रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) यांना शस्त्राचा धाक दाखवला. तसेच शिवीगाळ आणि दमदाटी करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी सोमनाथ माने यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम 352, 351(2), 3(5) तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांनी विशेष पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण आणि शोध मोहिमेच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत अटक केली.

कारवाईदरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करीत आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर, पोलिस हवालदार परशुराम म्हस्के, मेघराज जगताप, संदीप करे, किशोर मोहिते, प्रतिक धिवार आणि दादा जाधव यांनी सहभाग घेतला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

Fun Fortune and Everything Between at Spinlander Casino for Canada Players

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.