पुणे : सणासुदीच्या काळात सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारभावात सतत चढ-उतार पाहायला मिळत होते. आज बाजारात सोन्या-चांदीचे दर,पूर्णपणे स्थिर असल्याचे दिसून येत आहे.

सध्याच्या बाजारभावानुसार, 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅम दर 1,46,080 रुपये इतके आहेत. तसेच 24 कॅरेटचा 1 ग्रॅमचा भाव 14,608 रुपये, 8 ग्रॅमचा भाव 1,16,864 रुपये दुसरीकडे, 22 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅम दर 1,33,900 रुपये असून, याचा 1 ग्रॅमचा भाव 13,390 रुपये, 8 ग्रॅमचा भाव 1,07,120 रुपये आहे.

दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या १८ कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 1,09,560रुपये इतका असून, याचा 1 ग्रॅमचा भाव 10,956 रुपये, 8 ग्रॅमचा भाव 87,648 रुपये आणि 100 ग्रॅमचा भाव 10,95,600 रुपये नोंदवला गेला आहे. चांदीच्या दरांमध्येही आज कोणताही मोठा बदल झालेला नाही.

ऐन सणासुदीच्या दिवसांत सोने आणि चांदीचे दर स्थिर राहिल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, दागिने खरेदीचे नियोजन करणाऱ्यांचे आता पुढील दरबदलांकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, सराफा बाजारातून कोणतीही खरेदी करताना ग्राहकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
आगामी काळात सोन्या-चांदीच्या किमतीत काय बदल होतात, याकडे आता संपूर्ण बाजाराचे आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.






