पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील महत्त्वाच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (दि. 14) सुमारे 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या पुणेऐवजी खडकी, हडपसर किंवा सातारा स्थानकावरून धावणार आहेत.

ब्लॉकदरम्यान पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक 3 आणि 4 मुंबईकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची माहिती तपासूनच रेल्वे स्थानकावर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यायी स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या

-गाडी क्र. 12939 पुणे-जयपूर एक्सप्रेस खडकी स्थानकावरून सुटेल.
-गाडी क्र. 12128 पुणे-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस खडकी स्थानकावरून धावेल.
-गाडी क्र. 11425 पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस सातारा स्थानकावरून सुरू होईल.
खडकी स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या
– 12940 जयपूर-पुणे एक्सप्रेस
-12127 सीएसएमटी मुंबई-पुणे एक्सप्रेस
-99902 पुणे-तळेगाव लोकल
-99903 तळेगाव-पुणे लोकल
-71406 बारामती-पुणे डेमू
-71407 पुणे-दौंड डेमू
-71420 सातारा-पुणे डेमू
– 12135 पुणे-नागपूर एक्सप्रेस
-12136 नागपूर-पुणे एक्सप्रेस
-11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस
– 11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस
हडपसर स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या
– 11078 जम्मू तावी-पुणे झेलम एक्सप्रेस
-11406 अमरावती-पुणे एक्सप्रेस
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अद्ययावत वेळापत्रक आणि स्थानकांची माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







