Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 29 August 2026, 20:16

न्हावरे : कोणतीही खाजगी शिकवणी न लावता खोलीवरच तब्बल १६ तास स्व-अभ्यास,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंबळे(ता. शिरूर)येथील ऋषिकेश बाळासाहेब बेंद्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत ४०० पैकी ३१० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.विशेष म्हणजे, ऋषिकेश यांची उद्योग निरीक्षक तसेच दुय्यम निरीक्षक(राज्य उत्पादन शुल्क)या दोन्ही पदांसाठी निवड झाली असून,त्यांच्या या दुहेरी यशामुळे आंबळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ऋषिकेश बेंद्रे यांचे प्राथमिक शिक्षण आंबळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत,तर माध्यमिक शिक्षण न्हावरे येथील श्री.मल्लिकार्जुन विद्यालयात झाले. त्यानंतर शिरूर येथून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले.गुणवत्तेच्या जोरावर त्यांना पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे प्रवेश मिळाला.चार वर्षांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून इंजिनिअरची पदवी संपादन केली.

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्यासमोर चांगल्या पॅकेजची नोकरी करण्याची संधी होती.मात्र,आकर्षक पगाराची नोकरी करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे आणि प्रशासनाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेची सेवा करायची,असा निर्धार त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.

पहिल्याच प्रयत्नात अपयश आले; मात्र त्यातून खचून न जाता ऋषिकेश यांनी आपली जिद्द कायम ठेवली.२०२१ पासून पुण्यात तसेच वेळोवेळी गावाकडे राहून त्यांनी दररोज सुमारे १६ तास स्व-अभ्यास केला.कोणतीही खाजगी शिकवणी न लावता स्वतःच्या अभ्यासावर आणि सातत्यावर विश्वास ठेवत त्यांनी अखेर झालेल्या २०२५ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

 

ऋषिकेश बेंद्रे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आंबळे ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून त्यांचा जाहीर सत्कार केला. त्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशाचे श्रेय ऋषिकेश यांनी वडील बाळासाहेब बेंद्रे,आई माया बेंद्रे तसेच मार्गदर्शन करणारे शिक्षक यांना दिले आहे.खाजगी शिकवणी शिवाय स्व-अभ्यासातून मिळवलेले ऋषिकेश बेंद्रे यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.

“भावी अधिकाऱ्यांनी स्वप्नांचा पाठलाग करावा”

“कोरोनानंतर स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.त्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धाही प्रचंड वाढली आहे.मात्र, नवोदित विद्यार्थ्यांनी केवळ रिल्स किंवा बातम्या पाहून अथवा आई-वडिलांच्या आग्रहाखातर स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात येऊ नये. आपल्याला खरोखरच या परीक्षेत यश मिळवायचे असेल,तर प्रथम पदवीचे शिक्षण पूर्ण करून त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी.जिद्द, चिकाटी,सातत्य आणि योग्य नियोजनाच्या जोरावर निश्चितपणे यश मिळवता येते,” असा सल्ला ऋषिकेश बेंद्रे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांना दिला.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

२०२७ वनडे वर्ल्ड कपच्या थराराला २ ऑक्टोबरपासून होणार सुरूवात! पुन्हा होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; ICC कडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Thursday, 1 October 2026, 23:01

मुंबईत प्रवास करणे झाले महाग! मुंबईच्या ५ प्रवेशद्वारांवर टोलचे दर वाढले; आजपासून नवे दर लागू

Thursday, 1 October 2026, 22:37

दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर! निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्यभरात शोककळा

Thursday, 1 October 2026, 22:23

उन्नत महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी राहुल शेवाळेंचा पुढाकार! हडपसर ते उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; योग्य बाजारभावाची मागणी

Thursday, 1 October 2026, 21:56

ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान; राज्य शासनाच्या आदेशामुळे पुणे-पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली

Thursday, 1 October 2026, 21:16

उरुळी कांचन येथील डॉक्टर महिलेच्या घरातून ११ लाखांचे दागिने चोरी! पोलिसांचा तपास अपयशी; पोलिसांकडून ‘अ’ वर्ग फायनल समरीची प्रक्रिया

Thursday, 1 October 2026, 20:24
Next Post

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp