Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 August 2026, 19:20

लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट-6च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. सुशील तानाजी गायकवाड (वय 39, रा. दत्तनगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूल, काडतुसे, दोन मोबाईल आणि मोटारसायकल असा सुमारे 1 लाख 25 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट-6चे पथक 27 ऑगस्ट रोजी परिसरात गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. त्यावेळी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौधरी वस्ती परिसरात असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष कदम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. थेऊर येथील कांबळेवस्ती, म्हसोबा मंदिरामागील मोकळ्या जागेत काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर एक संशयित व्यक्ती फिरत असून, त्याच्याकडे गावठी पिस्तूल आहे, अशी माहिती मिळाली.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पोलिस पथकाने दोन पंचांना सोबत घेत संबंधित ठिकाणी धाव घेतली. तेथे मिळालेल्या वर्णनाशी मिळतीजुळती व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर बसलेली आढळून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव सुशील गायकवाड असल्याचे सांगितले. ताब्यात घेतल्यानंतर गायकवाड वारंवार कमरेला हात लावत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे चौकशी केली असता कमरेला पिस्तूल असल्याचे त्याने सांगितले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता पॅन्टमध्ये खोचलेले गावठी बनावटीचे पिस्तूल मॅग्झीनसह आढळून आले. मॅग्झीनची तपासणी केली असता त्यामध्ये चार जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच त्याच्याकडून दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.

पोलिसांनी पिस्तूल व काडतुसे बाळगण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या कारवाईत 40 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, 2 हजार 400 रुपयांची चार जिवंत काडतुसे, 11 हजार रुपयांचा विवो मोबाईल, 4 हजार 700 रुपयांचा रेडमी मोबाईल आणि 65 हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 1 लाख 25 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, संबंधित व्यक्ती पिंपरी आणि दक्षिण म्हाळुंगे परिसरातील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबतही पुढील तपास केला जात आहे.

 

ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष कदम, पोलिस उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्यासह गुन्हे शाखा युनिट-6च्या पथकाने केली. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) तसेच मुंबई पोलिस अधिनियम कलम 37(1)(2)(3) सह 135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने परिसरातील संभाव्य अनुचित प्रकाराला आळा बसल्याचे मानले जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp