Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 29 August 2026, 19:41

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील थेऊर येथे महावितरण कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या एका वरिष्ठ कंत्राटी कामगाराचा विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. 29) सायंकाळी चार वाजून दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अशोक किसन जवळकर (वय -52, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे) असे विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे आळंदी म्हातोबाची आणि कुंजीरवाडी परिसरात प्रचंड हळहळ आणि महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक जवळकर हे गेल्या 18 ते 19 वर्षांपासून थेऊर व परिसरात महावितरणची विजेची कामे करत होते. शुक्रवारी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास थेऊर परिसरातील एका ट्रान्सफॉर्मरवर दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू करण्यापूर्वी नियमानुसार ‘परमिट’ (वीज प्रवाह बंद करण्याचे अधिकृत पत्र) घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, डीपीवर चढून काम करत असताना अचानक मुख्य लाईनमध्ये विजेचा उच्च दाबाचा प्रवाह उतरला आणि जवळकर यांना विजेचा जोरदार धक्का बसला.

विजेचा तीव्र धक्का बसल्याने अशोक जवळकर हे थेट डीपीवरून खाली जमिनीवर कोसळले. त्यांना गंभीर अवस्थेत स्थानिक नागरिकांच्या व सहकाऱ्यांच्या मदतीने तातडीने लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली होती; डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले. परमिट घेतलेले असताना डीपीवर अचानक वीज प्रवाह सुरू कसा झाला? महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला का? असे गंभीर सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

 

दरम्यान, 18 वर्षे सेवा देऊनही सुरक्षा साधनांचा अभाव आणि तंत्रज्ञांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून, मृत जवळकर यांच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आळंदी म्हातोबाची व थेऊर परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp