Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 August 2026, 18:43

लोणी काळभोर : अमेरिकेत 2018 मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला चक्क जिवंत दाखवून त्याच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. एवढेच नव्हे, तर संबंधित व्यक्तीच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करून, त्याच नावाची दुसरी व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयात उभी करण्यात आली आणि तब्बल 39 लाख रुपयांची मालमत्ता विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धानोरी येथील मालमत्तेच्या कथित बनावट विक्रीप्रकरणी एका महिलेने विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार दिली असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी प्रिती रत्नाकर जोशी (वय 40 ) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या काकांची पुणे शहरातील धानोरी येथील सुमारे 1 .75 गुंठे जागा आणि त्यावरील पाच खोल्यांचे घर बनावट कागदपत्रांच्या आधारे विकण्यात आले आहे. प्रिती जोशी यांच्या काका प्रकाश बजरंग व्यास हे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे वास्तव्यास होते. त्यांचे 2018 मध्ये अमेरिकेत निधन झाले. त्यांना अपत्य नसल्याने त्यांच्या नातेवाईकांपैकी यतीश लक्ष्मीनारायण व्यास यांना ते मुलाप्रमाणे मानत होते.

प्रकाश व्यास यांच्या मालकीची धानोरी येथील मालमत्ता त्यांच्या देखरेखीखाली होती. प्रिती जोशी यांच्या आई विद्या रणनवरे यांनी 2014 मध्ये घराची देखभाल करण्यासाठी मॅथ्यू रायप्पा यानमल आणि कृपा शंकर दावर ऊर्फ पॉल यांना तेथे राहण्यास ठेवले होते. मात्र, कालांतराने त्यांनी घर खाली करण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सन 2021 मध्ये संबंधित घर विक्रीसाठी काढण्यात आल्याची माहिती प्रिती जोशी आणि त्यांच्या आईला मिळाली. त्यानंतर त्यांनी घरात राहणाऱ्या व्यक्तींना घर खाली करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी घर खाली केले नसल्याचा आरोप आहे.

दरम्यान, 2026 मध्ये या मालमत्तेबाबत अधिक चौकशी केली असता, घराची बनावट कागदपत्रे आणि कुलमुखत्यारपत्र तयार करून मालमत्ता विकल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रिती जोशी यांनी लोणी काळभोर येथील महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सह दुय्यम निबंधक, हवेली क्र. 6 कार्यालयातून संबंधित मालमत्तेच्या विक्रीचे कागदपत्रे मिळविल्यानंतर धक्कादायक बाब समोर आल्याचा दावा केला आहे.

 

प्रकाश व्यास यांचा 2018 मध्ये अमेरिकेत मृत्यू झाला असतानाही 2026 मध्ये त्यांच्या नावाने एका व्यक्तीला दुय्यम निबंधक कार्यालयात हजर करण्यात आले. या व्यक्तीच्या माध्यमातून मालमत्तेचे विक्री खत करण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित मालमत्ता हौसाबाई बारकू पवार यांना 39 लाख रुपयांना विकण्यात आल्याचे कागदपत्रांमधून दिसून आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. तसेच व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांमध्ये प्रकाश व्यास यांचे नाव आणि एका मोबाईल क्रमांकाचा उल्लेख असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

प्रकाश व्यास यांचा अमेरिकेतील मोबाईल क्रमांक वेगळा असल्याचे सांगत, नोंदणी कार्यालयात सादर करण्यात आलेली कागदपत्रे संशयास्पद असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. प्रकाश व्यास यांचे भारतात आधारकार्डच नसल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे. त्यामुळे विक्रीखतासाठी सादर करण्यात आलेले आधारकार्ड बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर विक्रीखतावरील स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसादेखील बनावट असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय, नोंदणी कार्यालयात विक्रीखत करताना प्रकाश व्यास यांच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीला उभे करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मॅथ्यू रायप्पा यानमल आणि कृपा शंकर दावर ऊर्फ पॉल यांना केवळ घराची देखभाल करण्यासाठी राहण्यास दिले होते. त्यांना सदर मालमत्तेचा मालकी हक्क किंवा विक्री करण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता, असे तक्रारदाराने स्पष्ट केले आहे. मात्र, मालकी हक्क नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तींनी संगनमत करून हा व्यवहार केल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. मालमत्तेच्या कथित विक्रीची माहिती मिळाल्यानंतर प्रिती जोशी यांनी संबंधित कागदपत्रांची माहिती घेऊन प्रांत कार्यालय तसेच सातबारा व फेरफार कार्यालयातही लेखी तक्रारी दाखल केल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.

प्रकाश व्यास यांच्या अमेरिकेतील मृत्यूचा दाखलाही संबंधित कागदपत्रांसह सादर करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात बनावट आधारकार्ड कोणी तयार केले, प्रकाश व्यास यांच्या नावाने नोंदणी कार्यालयात हजर झालेली व्यक्ती कोण होती, विक्रीखतावरील स्वाक्षरी व अंगठ्याचा ठसा खरा आहे की बनावट, तसेच 39 लाख रुपयांच्या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मृत व्यक्तीच्या नावाने मालमत्ता विक्रीचा हा आरोप खरा ठरल्यास नोंदणी प्रक्रियेतील सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. तक्रारीच्या आधारे विश्रांतवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तपासानंतर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या आणि व्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

Saturday, 29 August 2026, 19:56

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

Saturday, 29 August 2026, 19:20

युद्धाचा पुन्हा भडका; हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक इमारती उद्ध्वस्त

Saturday, 29 August 2026, 19:08

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

Saturday, 29 August 2026, 18:43
Next Post

युद्धाचा पुन्हा भडका; हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक इमारती उद्ध्वस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp