Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“मला नकार देण्याची शिक्षा मृत्यू?” एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय दामिनीवर चाकूने 17 ते 18 वार करून हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 19 October 2026, 10:04

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील वर्दे परिसरात 23 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी दामिनी किरण पालव हिच्या हत्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित साहिल विश्राम धुरी (वय 22) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री सुमारे 11:30 वाजता वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानुसार, एकतर्फी प्रेमातून हा गुन्हा घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दामिनी पालव कुडाळ तालुक्यातील महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. शनिवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. सायंकाळी एसटी बसने कडावल येथे उतरून ती वर्दे येथील आपल्या घरी पायी जात होती. त्याचदरम्यान कडावल-वर्दे रस्त्याजवळील ‘सायल्याचा व्हाळ’ परिसरात तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात तिच्यावर चाकूने 17 ते 18 वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामिनी आणि साहिल यांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. दोघांमध्ये गेल्या 2 वर्षांपासून संपर्क असल्याचे तपासात समोर आले आहे. साहिलने दामिनीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र तिने नकार दिल्याने तो नाराज होता, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणातील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे संशयिताची मोटारसायकल शोधण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मठ येथे पोहोचून साहिलला ताब्यात घेतले. त्याच्या हातालाही जखम झाल्याची माहिती आहे.

 

पोलिसांनी दामिनी आणि संशयिताचे मोबाईल फोन जप्त केल्याचे समजते. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, हल्ल्याचे कारण आणि अन्य कोणी सहभागी होते का, याचा तपास सुरू आहे. न्यायालयाने साहिल धुरी याला 24 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत. दरम्यान, हल्ला करण्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“मला नकार देण्याची शिक्षा मृत्यू?” एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय दामिनीवर चाकूने 17 ते 18 वार करून हत्या

Monday, 19 October 2026, 10:04

“गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे का?” राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं

Monday, 19 October 2026, 9:47

दसऱ्याआधी सोनं-चांदी स्वस्त! खरेदीसाठी हीच योग्य वेळ की दर आणखी घसरणार? वाचा

Monday, 19 October 2026, 9:35

पुण्यातील रुग्णालये बनले पार्किंगचे अड्डे? रुग्णांच्या नातेवाइकांचा संताप

Monday, 19 October 2026, 9:00

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘या’ वाहनांना बंदी! नियम मोडल्यास थेट होणार गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 8:48

महिनाभर टायगर श्रॉफवर नजर, मग अचानक गोळीबार! हल्ल्याआधी काय झालं? वाचा

Monday, 19 October 2026, 8:43
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp