Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अवघ्या साडेसात मिनिटांत चोरलेली फॉर्च्युनर वर्षभरानंतर थेट आंध्र प्रदेशात सापडली! शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 16 November 2026, 19:15

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : अवघ्या साडेसात मिनिटांत फॉर्च्युनर गाडी चोरून चोरटे पसार झाले मात्र शिक्रापूर पोलिसांनी वर्षभरानंतर या चोरीचा छडा लावत थेट आंध्र प्रदेशातून गाडी शोधून काढली. कोरेगाव भीमा येथील माजी सरपंच संदीप ढेरंगे यांची चोरीला गेलेली टोयोटा फॉर्च्युनर पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे चोरीची गाडी ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या पथकाला आंध्र प्रदेशात तब्बल पाच दिवस मुक्काम करावा लागला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन गाडी परत मिळाली.

१६ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या यशराज टॉवर परिसरातून संदीप ढेरंगे यांची MH 12 TH 9955 क्रमांकाची टोयोटा फॉर्च्युनर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. चोरट्यांनी अवघ्या साडेसात मिनिटांत ही महागडी गाडी लंपास केली होती .

या घटनेची परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नोंद झाली होती. फुटेजमध्ये दोन ते तीन संशयित व्यक्ती किया कारमधून परिसरात आल्याचे दिसून आले होते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करून चोरटे पसार झाले होते. या प्रकरणी संदीप ढेरंगे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चोरीला गेलेल्या वाहनाचा शोध सुरू ठेवून अखेर तपासादरम्यान ही फॉर्च्युनर आंध्र प्रदेश राज्यात असल्याची माहिती समोर आली.

आंध्र प्रदेशात पाच दिवस मुक्कामी थांबून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट पाठपुरावा चोरीची फॉर्च्युनर ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार अजित इंगवले पोलीस हवालदार विश्वंभर वाघमारे आणि माजी सरपंच संदीप ढेरंगे आंध्र प्रदेशात रवाना झाले. मात्र दुसऱ्या राज्यातून वाहन परत मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे या पथकाला तब्बल पाच दिवस तेथेच थांबावे लागले. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होऊन वाहन लवकरात लवकर ताब्यात मिळावे यासाठी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आंध्र प्रदेशातील संबंधित पोलीस आयुक्तांशी (CP) सातत्याने संपर्क साधत पाठपुरावा केला. तसेच पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांनीही संबंधित पोलीस आयुक्तांशी थेट संवाद साधून प्रकरणात लक्ष घातले होते .

दोन्ही राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि अखेर फॉर्च्युनर तातडीने ताब्यात घेण्यात आली.
अवघ्या साडेसात मिनिटांत चोरीला गेलेली फॉर्च्युनर वर्षभरानंतर आंध्र प्रदेशातून शोधून काढत पुन्हा मालकाच्या ताब्यात देण्यात आली असून शिक्रापूर पोलिसांचा सातत्यपूर्ण तपास पोलीस कर्मचाऱ्यांचा आंध्र प्रदेशातील पाच दिवसांचा मुक्काम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रभावी पाठपुरावा यामुळे संदीप ढेरंगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आपली चोरीला गेलेली गाडी पुन्हा मिळाल्याने ढेरंगे कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. शिक्रापूर पोलिसांच्या या कामगिरीची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अवघ्या साडेसात मिनिटांत चोरलेली फॉर्च्युनर वर्षभरानंतर थेट आंध्र प्रदेशात सापडली! शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Monday, 16 November 2026, 19:15

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp