Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 16 November 2026, 18:49

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन परिसरात हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या आडून अवैध दारूविक्रीचा धंदा सुरू असल्याचे दोन वेगवेगळ्या पोलीस कारवायांतून समोर आले आहे. ‘हॉटेल गुरू चायनीज पॉईंट’मध्ये चायनीज पदार्थांच्या व्यवसायाच्या आडून देशी-विदेशी दारूची विक्री केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली होती. तर खेडेकर मळा परिसरातील जगदंबा हॉटेलमधूनही देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. सलग उघडकीस येणाऱ्या या प्रकारांमुळे उरुळी कांचनमध्ये हॉटेल जेवणासाठी आहेत की दारूविक्रीची केंद्रे बनली आहेत, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन हद्दीत ‘हॉटेल गुरू चायनीज पॉईंट’च्या गाळ्यात विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांनी सोमवारी (ता. 26 ऑक्टोंबर) रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी हुसेन गफ्फुर शेख (वय 42, सध्या रा. उरुळी कांचन; मूळ रा. गाडेगाव रोड, बार्शी, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल आव्हाळे यांनी फिर्याद दिली होती.

दुसरीकडे, खेडेकर मळा परिसरातील जगदंबा हॉटेलमध्ये देशी-विदेशी दारूचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवारी (ता. 15) नोव्हेंबर सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत सुग्रीवदास शिवनाथ साकेत (वय 53, सध्या रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन; मूळ रा. रीवा, मध्य प्रदेश) याच्याकडून 1 हजार 780 रुपये किमतीच्या 22 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थातूरमातूर कारवायांनी अवैध धंदे थांबणार कसे?
एका बाजूला चायनीज सेंटरच्या नावाखाली दारूविक्री, तर दुसऱ्या बाजूला हॉटेलमध्ये दारूसाठा आढळत असल्याने परिसरातील अवैध धंद्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून अधूनमधून छापे टाकून कारवाई केली जात असली, तरी अशा प्रकारांना कायमचा आळा बसणार कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत. केवळ एखाद्या विक्रेत्याला पकडून किंवा किरकोळ दारूसाठा जप्त करून अवैध विक्रीचे जाळे उद्ध्वस्त होणार आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

कारवाई केवळ कागदावरच
गेल्या काही महिन्यात पोलिसांनी मटका, जुगार, बेकायदा दारू विक्रीविरोधात मोहीम उघडली आहे. मटका, बेकायदा दारू विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. पण या गुन्ह्यांमध्ये संशयितांना नोटीस देऊन सोडले जाते. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईची भीतीच गुन्हेगारांना राहिलेली नाही. अवैध धंद्यांवरील कारवाईची केवळ कागदेच रंगविली जातात. संशयिताला फारशी शिक्षा होत नसल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाडस वाढले आहे.

दरम्यान, उरुळी कांचन परिसरात हॉटेल, खाद्यपदार्थांची दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांच्या नावाखाली नेमके कोणते व्यवसाय सुरू आहेत, याची व्यापक तपासणी करण्याची मागणी होत आहे. अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अशा व्यवसायांना पाठीशी घालणाऱ्यांचाही शोध घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. अन्यथा पोलिसांच्या कारवाया केवळ कागदोपत्री आणि दिखाव्यापुरत्याच असल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे.

याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची अधिकृत प्रतिक्रिया समजू शकली नाही.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04

‘मफलर मॅन’ म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो! म्हणाले “या व्यक्तीने घातपात केला असं..” महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

Monday, 16 November 2026, 17:59
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp