Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 16 November 2026, 18:26

पुणे : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदांवर टीका करत, केवळ एका फोटोवरून विमान अपघाताशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी रोहित पवार अशा पत्रकार परिषदा घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत ‘मफलरवाला नेता’ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले, “एका कार्यक्रमात जाण्याचा आणि अजित पवारांच्या अपघाताचा काय संबंध? एका फोटोवरून अपघाताचे कनेक्शन जोडणे चुकीचे आहे.”

रोहित पवार प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी वारंवार पत्रकार परिषदा घेत असल्याची टीकाही बन यांनी केली. “आजपर्यंत त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या; मात्र एकही ठोस पुरावा दिलेला नाही,” असा दावाही त्यांनी केला.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून, हे पथक तपास करेल, असे नवनाथ बन यांनी सांगितले. दुसरीकडे, रोहित पवार यांनी या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी पुन्हा केली आहे.

विमान अपघाताच्या तपासावरून रोहित पवार आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, एसआयटीच्या तपासातून काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04

‘मफलर मॅन’ म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो! म्हणाले “या व्यक्तीने घातपात केला असं..” महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

Monday, 16 November 2026, 17:59

रेशनकार्ड विभक्त करताच धान्य बंद; उत्पन्नाचा दाखला अनिवार्य!

Monday, 16 November 2026, 17:42
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp